
Face Cake Smash Trend: आजकाल वाढदिवस म्हंटला की, प्रत्येकजण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, लेट नाईट पार्ट्या केल्या जातात. बरेचजण तर कूल दिसण्यासाठी फेस केक स्मॅशसारखा ट्रेंड फॉलो करतात. पण या ट्रेंडमुळे अनेक लोक गंभीर जखमी होतात. काही प्रकरणांमध्ये लोक आपला जीवही गमावतात. याचसंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ पाहिल्यानंतर हा जीवघेणा ट्रेंड टाळणेच चांगले असे कोणालाही वाटून जाईल.
फेस केक स्मॅश ट्रेंड धोकादायक
आजकाल फेस केक स्मॅशचा ट्रेंड खूप चालू आहे. या ट्रेंडमध्ये, लोक ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, त्याच्या चेहऱ्यावर केक थापतात. किंवा केकवर संबंधित व्यक्तीचा चेहरा आपटतात. ज्यामुळे अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेंडचे अनुसरण करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन सर्वत्र केले जात आहे.
पहा हा व्हिडिओ-
उम्मीद करते हैं यह वीडियो देखने के बाद आप ऐसी गलती कभी नहीं करेंगे,
कभी-कभी कूल दिखाने के चक्कर में हम ऐसी हरकत कर बैठते हैं जिससे दूसरों की जिंदगी खतरे में पड़ जाती है,
क्या आपने भी कभी किसी अपने के साथ ऐसा जन्मदिन मनाया है ? pic.twitter.com/VHkEIViWU4
— Vikku Sachan (@vikkusachan) August 6, 2025
असाच एक आवाहन करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका विक्कू सचन नावाच्या युजरने एक्स वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याचे दाखवले आहे. ज्यात एक महिला केकवरील मेणबत्ती विझवण्यासाठी फुक मारते तोच तिचा जवळचा एक व्यक्ती मागून महिलेचे डोके धरतो आणि केकवर जोरात मारतो. त्यानंतर, महिला बेशुद्ध होते. ती उठतच नाही. तो व्यक्ती तिचे केस धरून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती उठूच शकत नाही.
व्हिडिओच्या शेवटी, मोठ्या किंवा बहुस्तरीय केकमध्ये आकार ठेवण्यासाठी टोकदार लाकडी स्टँड बसवलेले दाखवले आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याचा चेहरा अचानक केकवर आदळला तर तो त्यांना टोचू शकतो, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. एक्स वर पोस्ट केलेला व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. पोस्ट केल्यापासून, हा व्हिडिओ लाखो युजर्सपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, वापरकर्त्यांनी स्पष्टपणे चिंता व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, "हा कसला विनोद आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे..." दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "ही चिंतेची बाब आहे. आजकाल तरुणांमध्ये हा ट्रेंड बनत आहे. अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक धडा शिकत नाहीत."