
ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. या फेरीसाठी प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. ८ ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत ३ लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील नियमित फेरीमध्ये ३ लाख १० हजार ७०८ इतके प्रवेश झाले आहेत. तसेच कोटामध्ये ४ लाख ६०३ इतके प्रवेश झाले आहेत. ज्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे.