मुंबईत मांजरांच्या नसबंदीसाठी मोहीम तीव्र!

  33

मुंबई : भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येबद्दलच्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून, बीएमसीने मांजरांच्या नसबंदी मोहीमेला गती देण्यासाठी चार अतिरिक्त स्वयंसेवी संस्थांना नियुक्त केले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत २४,५०४ मांजरांची नसबंदी करण्यात आली आहे, ज्यात निम्म्याहून अधिक शस्त्रक्रिया (१३,०९४) गेल्या १८ महिन्यांत झाल्या आहेत.


मांजरांच्या चावण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे बीएमसीने हा कार्यक्रम सुरू केला होता. सुरुवातीला फक्त दोन स्वयंसेवी संस्था यात सहभागी होत्या, ज्यांनी ऑगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६,३९२ मांजरांची नसबंदी केली. 'वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स' आणि 'मुंबई वेटरनरी कॉलेज' यांसारख्या चार नवीन स्वयंसेवी संस्थांच्या समावेशामुळे ही मोहीम अधिक तीव्र झाली आहे.



एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, जरी स्वयंसेवी संस्था कठोर परिश्रम घेत असल्या, तरी निवासी क्षेत्रे आणि झोपडपट्ट्यांमधून मांजरांना पकडणे आणि त्यांचा मागोवा घेणे हे अजूनही एक आव्हान आहे.


बीएमसीने आपल्या तीन वर्षांच्या कुत्रा आणि मांजर नसबंदी कार्यक्रमासाठी ६ कोटींचे वाटप केले आहे आणि कराराच्या तपशीलानुसार स्वयंसेवी संस्थांना प्रति मांजर १,६०० ते २,२०० देते.

Comments
Add Comment

येथे झाली ठाकरे बंधूंची युती; ठाकरे गट १९ तर मनसे २ जागांवर लढणार!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून

राखीने जोडले दोन अनोळखी कुटुंब, अवयवदानाने निर्माण केले नवे नाते!

मुंबई : रक्षाबंधनाच्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी सोहळ्यात, मुंबईच्या १६ वर्षीय अनामता अहमदने गुजरातमधील

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार चालवणाऱ्या मुजोर वाहन मालकाला अटक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखा परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन

ओला उबेरला आव्हान देणार भारत टॅक्सी

मुंबई : ओला, उबेर या खासगी अ‍ॅप आधारित सेवांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी देशात सहकारी तत्वावर ‘भारत टॅक्सी ’

पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसा ब्लॉक नाही

सांताक्रूझ, माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक मुंबई : शनिवार मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग

अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

मुंबई : अकरावी अर्थात FYJC प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांची प्रक्रिया झाली आहे. आता अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीची