अजित डोभाल यांनी घेतली पुतिन यांची भेट, रशियाचे राष्ट्राध्यक्ष लवकरच भारतभेटीवर

  41

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वर्षाच्या अखेरीस भारत भेटीसाठी पंतप्रधान मोदींनी केले आमंत्रित


मॉस्को: एकीकडे रशिया आणि भारत दरम्यान वाढत्या मैत्रीमुळे अमेरिकेची पोटदुखी वाढत चालली आहे. भारत काही आपले ऐकत नाही म्हणून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट ५०% कर लादत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा निषेध भारताने केला असून, या संदर्भात हालचालींना वेग आला आहे. यादरम्यानच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल रशियामध्ये आहेत आणि त्यांच्या एकामागून एक जलद बैठका सुरु आहेत. अजित डोभाल यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे, त्यानुसार लवकरच पुतिन भारत भेटीस येणार असल्याचे, भेटीच्या तारखा जवळजवळ निश्चित झाल्या असल्याच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत.



अजित डोभाल यांची मॉस्कोमध्ये पुतिन यांसोबत भेट


राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली. डोभाल म्हणाले की पुतिन यांच्या भारत भेटीबद्दल ते खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. तसेच त्यांच्या भारत भेटीच्या तारखा जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. ते म्हणाले की भारत आणि रशियामधील संबंध विशेष आणि जुने आहेत. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय बैठकांमुळे भागीदारी आणखी मजबूत झाली आहे.


डोभाल यांनी रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांचीही भेट घेतली, जिथे संरक्षण आणि लष्करी-तांत्रिक सहकार्यावर चर्चा झाली. याशिवाय नागरी विमान निर्मिती, धातू उद्योग आणि रासायनिक क्षेत्रात सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांवरही चर्चा झाली. यासोबतच डोभाल यांनी रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशीही चर्चा केली. शोइगु म्हणाले की, भारत आणि रशियामधील मैत्री मजबूत आहे आणि काळाच्या कसोटीवर उतरली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रपती पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आगामी मोठ्या बैठकीची तारीख लवकरच निश्चित करणे महत्त्वाचे आहे.



पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची फोनद्वारे चर्चा


डोभाल रशिया दौऱ्यावर असताना, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फोनवर दीर्घ चर्चा केली. यादरम्यान, दोघांमध्ये युक्रेन युद्ध, द्विपक्षीय मुद्दे आणि धोरणात्मक भागीदारी यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.


पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चांगली आणि सविस्तर चर्चा झाली. पुतिन यांनी युक्रेन मुद्द्यावरील ताज्या परिस्थितीबद्दल माहिती दिली, ज्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आम्ही भारत-रशिया द्विपक्षीय अजेंडाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना या वर्षाच्या अखेरीस भारत भेटीसाठी आमंत्रित केले आहे.'



अमेरिकेसाठी मोठा राजनैतिक संदेश


केवळ राष्ट्राध्यक्ष पुतिन भारतात येत नाहीत तर पंतप्रधान मोदींच्या चीन भेटीचीही घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याशीही फोनवर चर्चा केली. इतकेच नव्हे तर पुतिन आणि ट्रम्प यांची भेट देखील निश्चित झाली आहे. येत्या १५ ऑगस्टला रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. ज्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.  त्यामुळे या सर्व घडामोडीं अमेरिकेसाठी एक मोठा राजनैतिक संदेश म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

ट्रम्पनी जाहीर केले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी ४३८ कोटींचे बक्षीस

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी जाहीर केलेल्या बक्षीसाची

ट्रम्प यांची 'बोलती बंद' करणारी धक्कादायक आकडेवारी समोर!

भारतावर आरोप करणारे ट्रम्प स्वतः रशियाशी किती व्यापार करतात? डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका; स्वतः

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश, मिनिटाला ६० गोळ्या झाडणार

बीजिंग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या

Kelley Mack : 'द वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन; वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड आणि टीव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केली मॅक (Kelley Mack) हिचं वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झालं आहे.

टॅरिफची धमकी देऊनही भारत-रशिया मैत्री 'जैसे थे'च! चिडलेले ट्रम्प म्हणाले "२४ तासांत भारतावर..."

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भारी कर वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. एका