
९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भारतीय सैनिकांची भीषण चकमक
जम्मू-काश्मीर: कुलगाममधील अखल भागात दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीचा आज नववा दिवस आहे. रात्रभर परिसरात मोठ्या स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येत होते. या दरम्यान, काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान शहीद झाले, तर इतर दोन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे भारतीय लष्कराची दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक सुरु आहे, ज्यात आतापर्यंत, एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. तर एकूण दोन सैनिक शहीद झाले असल्याचे वृत्त आहे. तर दहा सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, घनदाट जंगल आणि नैसर्गिक गुहासारख्या लपण्याच्या ठिकाणांचा फायदा घेत किमान तीन किंवा त्याहून अधिक दहशतवादी अजूनही या ठिकाणी लपून बसले आहेत. ही चकमक गेल्या अनेक दशकांमधील सर्वात जास्त काळ चालणारी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे.