
बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत जवळीक असल्यामुळे कपिल शर्माला धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे. 'जो बॉलवूड अभिनेता सलमान खानसोबत काम करेल, तो संपेल' (जो सलमान के साथ काम करेगा वो मरेगा...) सअशी धमकी लॉरेन्सच्या गुंडांनी दिली आहे. या धमकीची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे.
कपिल शर्माने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीजनच्या पहिल्या एपिसोडमध्ये बोलवले होते. यामुळेच बिश्नोई टोळी नाराज झाली आणि त्यांनी कपिलच्या कॅफेवर गोळीबार केला, असे वृत्त आहे.
हॅरी बॉक्सरची व्हायरल ऑडिओ क्लिप
सलमान सोबत जो जो काम करेल, तो तो संपेल... प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही, जो सलमानसोबत काम करेल, त्याच्यावर गोळी झाडली जाईल... असे हॅरी बॉक्सर म्हणाला. त्याची या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण
सलमानसोबत काम केले तर... ही इंडस्ट्रीला मिळालेली धमकी आणि कपिल शर्माच्या कॅफेबाहेर दोन वेळा झालेला गोळीबार यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काळवीट शिकार प्रकरण
राजस्थानमध्ये काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला दोषी समजतो. यामुळे बिश्नोई टोळी सलमानला ठार मारण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणामुळे सलमानने खासगी संरक्षण घेतले आहे. शिवाय पोलिसांकडूनही त्याला संरक्षण दिले जात आहे.