'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. बलात्काराची घटना २३ जुलैला घडली होती. ३ ऑगस्टला हैदर अलीला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वेळेत तो पाकिस्तान शाहीन्सकडून ३ ऑगस्टला बॅकेनहेममध्ये वनडे सामना खेळत होता.


पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विधानानुसार पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती मिळाली आहे. पीसीबीने म्हटलंय की ते खेळाडूंची भलाई आणि कायदेशीर अधिकारांना अधिक प्राथमिकता देतात.


यामुळे मंडळाने सुनिश्चित केले की हैदर अलीला कायदेशीर मदत दिली जाईल. यामुळे त्याची सुरक्षा आणि अधिकारांची रक्षा केली जाईल. तसेच जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हैदर अलीला अनिश्चित काळासाठी निलंबित केले जात असल्याचा निर्णयही पीसीबीने घेतला आहे.


हैदर अलीने २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत २ वनडे आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी-२०मध्ये त्याच्या नावावर ५०५ धावा आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने २७ सामन्यांमद्ये १.७९७ धावा केल्या तर त्याची सरासरी ४७हून अधिक आहे.


Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव