Sunday, August 10, 2025

NSDL शेअर्समध्ये १९% तुफानी IPO किंमतीपेक्षा ६२% अधिक प्रिमियम दरात सुरू 'या' कारणाने

NSDL शेअर्समध्ये १९% तुफानी IPO किंमतीपेक्षा ६२% अधिक प्रिमियम दरात सुरू 'या' कारणाने
मुंबई: एनएसडीएल कंपनीचा शेअर थोडाथोडका नाही तर तब्बल १९% उसळला आहे. सकाळी ११.४३ वाजता कंपनीचा शेअर १८.९८% उसळला होता. सकाळी शेअर बाजार उघडल्यावरच १ ५% पेक्षा अधिक प्रमाणात उसळला होता. त्यामुळे आज ही बाजा रात मोठी रॅली झाल्याने एनएसडीएलचा शेअर आयपीओतील मूळ किंमतीपेक्षा जवळपास ६२% हून अधिक दरात विकला जात आहे.एनएसडीएल कंपनीचा शेअरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तत्पूर्वी कंपनीच्या आयपीओलाही मोठा तुंबळ प्रतिसाद मिळाला होता. एनएसडीएलच्या ४०१०.९५ कोटींच्या आयपीओला पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडूनही विशेष प्रतिसाद मिळाल्याने कंपनीच्या आयपीओला एकूण ४१.०२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. त्यामध्ये श्रेणीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) ७.७६% वेळा,पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून १०३.९७ वेळा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) यांच्याकडून ३४.९८ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले हो ते.

लिस्टिंगपूर्वी, कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स आयपीओ किमतीपेक्षा जवळजवळ १६ टक्के ग्रे मार्केट प्रीमियमसह व्यवहार करत होते. विश्लेषकांच्या मते, एनएसडीएलचे मजबूत मूलभूत तत्त्वे आणि डिपॉझिटरी सेगमेंटमधील नेतृत्व पाहता गुंतवणूकदारांनी हा शेअर दीर्घकाळासाठी ठेवण्याचा विचार करावा.एनएसडीएलचा पी/ई रेशो सध्या ७७ च्या आसपास आहे जो पीअर सीडीएसएलच्या पी/ई रेशोपेक्षा जास्त आहे ज्याचा पी/ई रेशो सध्या ६६ च्या आसपास आहे.

का एनएसडीएल शेअर्सला इतका प्रतिसाद?

मूल्य-आधारित व्यवहार आणि संस्थात्मक खाते होल्डिंगमध्ये एनएसडीएल आघाडीवर आहे, ज्याला उद्योगातील मजबूत विश्वास आणि तांत्रिक पायाभूत सुविधांचा पाठिंबा आहे. सीडीएसएल सोब त, ते जवळजवळ द्वैध धोरणात काम करते, नवीन खेळाडूंसाठी (New Players) उच्च प्रवेश अडथळे आहेत. वाटप केलेल्या गुंतवणूकदारांसाठी, दीर्घकालीन दृष्टिकोनातून शेअर्स धारण करणे उ चित आहे. वाटप न केलेले गुंतवणूकदार लिस्टिंगनंतरच्या कोणत्याही घसरणीची वाट पाहू शकतात.' असे बाजार तज्ञ म्हणत आहेत.
Comments
Add Comment