
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली. रिअल्टी (२.११%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.८२%), मेटल (१.७६%), कंज्यूमर ड्युरेब ल्स (१.९१%), ऑटो (१.४०%) निर्देशांकात घसरण झाली आहे.सकाळची घसरण गुंतवणूकदारांच्या घसरलेल्या भावनांसह बंद झाली आहे. कालही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४९९७ को टींची गुंतवणूक बाजारातून काढली होती आजही तोच कित्ता एफ आयआयने गिरवला असल्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे भारतीय गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणा त सेल ऑफ केल्याने बाजारात कुठल्याच प्रकारच्या समभागात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही दुसरीकडे भरमसाठ डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने तसेच रूपयात घसरण झाली आहे. ज्यामध्ये बाजारातील गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले आहे.
आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढला होता तो अखेरच्या सत्रातही २.९५% उसळला होता.सकाळी ११ नंतर निफ्टी लेवल मर्यादेपेक्षा वाढूच शकली नाही ज्याचा फट का बाजारात बसला.दुसरीकडे आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकातही अस्थिरतेचा फटका बसल्याने सोने महागले होते. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१८% इ तकी मोठी वाढ झाली आहे.कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे विशेषतः ओपेक राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवले असले तरी ते केवळ कागदोपत्री आहे प्रत्यक्ष स्पॉट मा गणीत वाढ झाली असून कच्च्या तेलाच्या प्रोसेंसिंगमध्ये उत्पादन खर्चात वाढ झाल्याने बाजारात तेलाचे दर नियंत्रित होऊ शकले नाहीत. रुपयानेही आज दिवसभरात डोके वर काढले नाही याचा एकत्रित परिणाम म्हणून बाजार कोसळले.
आजच्या सुरूवातीच्या युएस बाजारातील तिन्ही डाऊ जोन्स (०.३३%), एस अँड पी ५०० (०.५५%), नासडाक (०.५४%) बाजारात वाढ झाली. आशियाई बाजारातील ठोस ट्रिगर नसल्याने अस्थिर तेचा फटकाही बसत आहे. परिणामी आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवल्यानंतरही बाजार संमिश्र पातळीवर राहिले. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.८२%), जकार्ता कंपोझिट (०.५७%) बाजारात घसरण झाली असून सर्वाधिक घसरण हेंगसेंग (०.९०%), सेट कंपोझिट (०.४८%) बाजारात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्लोबल हेल्थ (७.२७%), कल्पतरू (६.३५%), साई लाईफ (४.५९%), बँक ऑफ महाराष्ट्र (३.०९%), कजारिया सिरॅमिक्स (३.०५%), लाईफ इन्शुरन्स (३.१६%), सारेगामा इंडिया (२.६३%), जेके सिमेंट (२.३६%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (२०.०९%), कल्याण ज्वेलर्स (१०.६४%), कोफोर्ज (५.७१%), डेटा पँटर्न (५.५३%), भारत डायनामिक्स (४.४१%), विशाल मेगामार्ट (३.८३ %), भारती एअरटेल (३.३३%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.२०%), आर आर केबल्स (२.९१%), भारत फोर्ज (२.२७%), एमसीएक्स (२.१९%), झेन टेक्नॉलॉजी (२.०९%), झी एंटरटेनमेंट (१.६४%), ए चडीएफसी बँक (१.०८%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले की,' नेहमीप्रमाणे च शुक्रवारचा बाजार खाली आला आहे. जागतिक पातळीवरील अ निश्चितता बाजारावर परीणाम करीत आहे.अमेरिकेत मोठी मंदी येण्याच्या परिस्थितीत जगात काय परिणाम होईल हे निर्देशनास आणण्यास ही शक्यता खरी होण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. अनेक अर्थतज्ञ ही भाकीत वर्तवत आहेत. त्याचे गंभीर परिणाम जगालाही भोगावे लागणार असे चित्र आहे. रशियाने त्याच्या देशातून अमेरिकेत जाणारी पाईप लाईन तोडण्याची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेशी असलेली अण्वस्त्र धमक्याचा करार रद्द केला आहे.आता रशिया अमेरिकेला थेट धमकी देऊ शकेल.एकंदरीत ब्रिक्स देश व त्यातील रशिया चायना भारत टेरिफ विषयावर एकत्र आलेले व भेटी गाठी घेताना पहायला मिळत आहे. ट्रम्प टेरिफ संबधित अमेरिकेतून होत असलेला विरोध भारताकडे डायव्हर्ट करत जगाचे लक्ष भारताकडे वळवत आहेत. पण या सगळ्याचा परि णाम म्हणून भारतालाच सहानुभुती मिळत आहे. याचा फायदा भारताला व्यापारात नक्कीच मिळेल. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडावी याकरिताचे हे प्रयत्न आहेत. पण या सर्व गोष्टी हाताळण्यात भारत सक्षम आहे. ही जाणीव अमेरीकेला बोचत आहे.
आपला बाजार या सगळ्यातून लवकरच सावरेल. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री हेच या मागील कारण आहे. आज बहुतेक इंडेक्सच्या सर्व कंपन्यात थोडी थोडी घट झाली आहे. म्हणून निर्देशांक ७६५ अंक खाली दाखवत आहे.पण भारताचे आर्थिक धोरण व नियोजन इंटॅक्ट आहे. पुढील आठवड्यातील परिस्थितीत पाहून बाजाराचा कल समजेल तोपर्यंत जागतिक पातळीवरील अमेरिकेचे मनोरंजन एन्जॉय करू.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले की,' भारतीय पंतप्रधा नांच्या जोरदार टिप्पण्यांमुळे येत्या काळात अमेरिकेसोबत टॅरिफ वाटाघाटी होण्याची आशा कमी झाल्याने आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी भारतीय शेअर बाजारांवर विक्रीचा दबाव दिसू न आला. कालच्या किरकोळ वाढीनंतर निफ्टी १% ने घसरून २३३ अंकांनी घसरला. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर अतिरिक्त २५% कर लादल्याने एकूण टेरिफ ५०% झाला आणि भारताची नि र्यात स्पर्धात्मक झाली नाही. व्यापक बाजारपेठांमध्येही घसरण झाली, ज्यामध्ये स्मॉलकॅप १०० १.५% आणि मिडकॅप १०० १.६% ने घसरले.
सर्व क्षेत्रे घसरणीच्या स्थितीत बंद झाली, निफ्टी रिअॅलिटी २% पेक्षा जास्त घसरली, त्यानंतर धातूंमध्ये १.८% घसरण झाली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) पाठिंबा देणे सुरू ठेवले ऑगस्टमध्ये आतापर्यंत अंदाजे २९००० कोटींची गुंतवणूक केली, जरी FIIs ने १६००० कोटींची विक्री केली. पुढे पाहता, बाजार पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश कर तील, ज्यामुळे स्टॉक-विशिष्ट हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत, टॅरिफ फ्रंटवर स्पष्टता येईपर्यंत इक्विटीज एकत्रीकरण मोडमध्ये राहतील अशी आमची अपेक्षा आहे. या अस्थिर वातावर णात, गुंतवणूकदार देशांतर्गत-केंद्रित विषयांवर लक्ष केंद्रित करू शकतात, तर व्यापाऱ्यांना हलके स्थान ठेवण्याचा सल्ला दिला जातो.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'अमेरिकेच्या आयात शुल्काच्या भारतीय निर्यातीवर होणाऱ्या परिणामांबद्दलच्या वाढत्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजार तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. एफआयआय निव्वळ विक्री करणारे राहिले, ज्यामुळे देशांतर्गत निर्देशांकांवर द बाव वाढला. निराशावाद व्यापक होता, ज्यामध्ये रिअल्टी आणि धातूंना सर्वाधिक फटका बसला. याव्यतिरिक्त, जागतिक वित्तीय संस्थांनी चालू असलेल्या आयात शुल्क चिंतेचे प्रतिकूल परिणाम उ द्धृत करून भारताच्या आर्थिक दृष्टिकोनात घट करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२५ आणि २०२६ साठीच्या वाढीचे अंदाज कमी करण्यात आले आहेत, जे भारताच्या व्यापार आणि समष्टि (Unce rtainty) आर्थिक वातावरणाभोवती वाढलेली अनिश्चितता दर्शवते.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'निफ्टी ताशी चार्टवर ५० ईएमए (Exponential Moving Aver age EMA) च्या वर टिकून राहण्यात अपयशी ठरल्याने दक्षिणेकडे सरकला, जो सध्याचा विक्रीचा दबाव दर्शवितो. शिवाय, निर्देशांक २४४०० पातळीच्या महत्त्वपूर्ण समर्थन पातळीच्या खाली बंद झाला, जो मंदीची ताकद अधोरेखित करतो. भावना आधीच मंदीच्या बाजूने झुकलेली होती, निर्देशांकाने खालच्या-वरच्या, खालच्या-तळाशी पॅटर्न तयार केला. अल्पकालीन कल कमकुवत राहिला आहे, २४१५०-२४२०० पातळीच्या दिशेने संभाव्य घसरण आहे. वरच्या बाजूला, २४४७५-२४५०० पातळीवर प्रतिकार दिसून येतो.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' सोन्याच्या किमती अस्थिर राहिल्या आणि देशांतर्गत किमतींना आधार मिळाला. एमसीएक्स गोल्ड ३५० च्या वाढीसह १०११८० पातळीवर स्थिरावला, तर कॉमेक्स गोल्ड $३३८० ते $३४०५ च्या दरम्यानच्या मर्यादित श्रेणीत $३३९० च्या आ सपास राहिला. पुढे जाऊन, ट्रम्पच्या टॅरिफ भूमिकेमुळे अनिश्चितता निर्माण होत असल्याने, विशेषतः भारत करार सध्या तरी बंद असल्याने, किमती अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. रुपयातील को णत्याही सकारात्मक हालचालीमुळे सोन्याच्या वाढीवर मर्यादा येऊ शकतात. सध्या, सोने १००००० ते १०२५०० पातळीच्या विस्तृत श्रेणीत व्यापार होण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' अमेरिकेकडून सुरू असलेल्या टेरिफ चिंतेमुळे रुपया ८ ७.६६ च्या जवळ घसरला. सध्या २५% टॅरिफ लागू असल्याने आणि अतिरिक्त २५% प्रस्तावित असल्याने, रुपयावरील दबाव वाढतच आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, व्यापार करारांच्या ठरावांमध्ये विलंब झाल्यामुळे रुपया दबावाखाली आहे. व्यापार आघाडीवर कोणतीही सकारात्मक प्रगती झाल्यास रुपया कमकुवत होऊ शक तो. चलन ८७.४० ते ८७.९५ च्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'
त्यामुळे एकूणच बाजारातील फंडामेंटल सातत्याने मजबूत होत असले तरी अस्थिरतेतही तितक्यात पटीने वाढ होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. यामुळे भारत टेरिफवर आगामी काळात काय पावले उचलतो तसेच आगामी घरगुती गुंतवणूकदारांकडून झालेली गुंतवणूक, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दिलेला कौल, यापुढील तिमाही निकाल या सगळ्याचा परिणाम पुढील आठवड्यात स्पष्ट होईल तत्पूर्वी बाजारात अस्थिरता सोमवारी पुन्हा सकाळी पुनरागमन करते का याकडे आता गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे.