Sunday, August 10, 2025

मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षीही घेतला नाही पगार

मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षीही घेतला नाही पगार

२०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छेने सोडला होता पगार


कोरोनापूर्वी सलग १२ वर्षे घेत होते वार्षिक १५ कोटींचा पगार


प्रतिनिधी: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षीही कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही. वित्तीय वर्ष २०२०-२१ पासून अंबानी यांनी कोणतेही वेतन स्वीकारलेले नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. को विड-19 महामारीनंतर उद्भवलेल्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने आपला पूर्ण पगार, भत्ते, निवृत्ती लाभ आणि कोणताही कमिशन घेणे बंद केले होते. कोरोनापूर्वी, २००८-०९ ते २०१९-२० या दरम्यान सलग १२ वर्षे अंबानी यांनी आपले वार्षिक पारिश्रमिक १५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवले होते. यामागे उद्दिष्ट होते की, व्यवस्थापन स्तरावर इतरांसाठी एक वैयक्तिक आदर्श उभा करणे.


यावर कंपनीने पुढे म्हटले आहे,' लक्षात घ्यावे की कोविड महामारीने भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीवर मोठा परिणाम केला होता. याचा उल्लेख रिलायंसच्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.' या अहवालानुसार, कंपनीचे एक्झि क्युटिव डायरेक्टर निखिल मेसवानी यांना वर्षाला एकूण २५ कोटी रुपये वेतन व इतर लाभ मिळतात. त्याचप्रमाणे,त्यांचे धाकटे बंधू हितल मेसवानी यांचेही वार्षिक वेतन २५ कोटी रुपये आहे.रिलायंसचे आणखी एक एक्झिक्युटिव डायरेक्टर पी. एम. एस. प्रसाद यां ना सुमारे २० कोटी रुपये वार्षिक वेतन व इतर लाभ मिळतात.

Comments
Add Comment