
दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल लेन भागात गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता धक्कादायक घटना घडली. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता दिल्लीतील निजामुद्दीनमधील जंगपुरा भोगल लेनमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून आसिफची हत्या झाली, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत करणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आढावा बैठक महाड (वार्ताहर) : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग ...
पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफ कुरेशी आणि दोन जणांमध्ये त्याच्या घराच्या मुख्य गेटसमोर दुचाकी पार्किंगवरून वाद झाला. वाद चिघळताच आरोपींनी आसिफवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
आसिफच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नी सायनाज कुरेशी आणि नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की आरोपींनी केवळ पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरूनच निर्दय हल्ला केला. सायनाजच्या मते, याआधीही आरोपी आणि आसिफ यांच्यात याच कारणावरून वाद झाले होते, ज्यामुळे ही जीवघेणी घटना घडली.
नेमकं काय घडलं
गुरुवारी रात्री कामावरून घरी परतलेल्या आसिफला घराच्या मुख्य गेटसमोर शेजाऱ्यांची दुचाकी पार्क केलेली दिसली. त्याने ती हटवण्याची विनंती केली असता वाद चिघळला. शेजाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप पत्नी सायनाज कुरेशी यांनी केला आहे.