दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

  37

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती


भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणपूरक पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमिपूजन दिवाळीत करण्याचा मानस आहे. दोन वर्षांत हा प्रकल्प नागरिकांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिली आहे.


प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरासाठी घोषित झालेला पॉड टॅक्सी प्रकल्प हा गुजरातमधील बडोदा येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पानंतर महाराष्ट्रातील हा दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प ठरणार आहे. यासाठी १ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च असुन तो पीपीपी तत्वावर राबवला जाणार आहे. तर महापालिका कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणार आहे.


किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच प्रकल्प उभारला जाईल त्यात १६ पॉड टॅक्सी स्थानके मेट्रो स्थानकांना जोडले जातील. अवघ्या दोन मिनिटात ती उपलब्ध असेल आली दोन किलोमीटरसाठी ३०रुपये तिकीट दर असेल. प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०२५ अखेरीस होण्याची शक्यता आहे. प्रारंभिक टप्प्यात प्रकल्पाची सुरुवात जे पी इन्फ्रा परिसर, प्रभाग १२, १३, १८ येथील रुंद रस्त्यांवरून होणार आहे.

Comments
Add Comment

मोरबे धरणाच्या पातळीत घट

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत

सणासुदीला ठाण्यात वाहतूक कोंडीचा महाकाय विळखा!

ठाणे : रक्षाबंधन सणादरम्यान शनिवारी हजारो प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वाहतूक

गणेशोत्सव तोंडावर; मंडप अर्ज पडून, ८८ गणेश मंडळांच्या अर्जाला परवानगी मिळेना

ठाणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे मात्र अजूनही ८८ गणेश मंडळांच्या अर्जाला परवानगी मिळाली नाही.

नारळी पौर्णिमेनिमित्ताने वाहतुकीत बदल

ठाणे : कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते या काळात वाहतूक पोलिसांनी

पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी १३२ कृत्रिम तलाव

ठाणे : उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तींना परवानगी दिल्यामुळे पीओपी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मार्ग

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा चषकाचे अनावरण

भाईंदर : गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रो-गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या