Sunday, August 10, 2025

दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती


भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणपूरक पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमिपूजन दिवाळीत करण्याचा मानस आहे. दोन वर्षांत हा प्रकल्प नागरिकांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिली आहे.


प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरासाठी घोषित झालेला पॉड टॅक्सी प्रकल्प हा गुजरातमधील बडोदा येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पानंतर महाराष्ट्रातील हा दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प ठरणार आहे. यासाठी १ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च असुन तो पीपीपी तत्वावर राबवला जाणार आहे. तर महापालिका कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणार आहे.


किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच प्रकल्प उभारला जाईल त्यात १६ पॉड टॅक्सी स्थानके मेट्रो स्थानकांना जोडले जातील. अवघ्या दोन मिनिटात ती उपलब्ध असेल आली दोन किलोमीटरसाठी ३०रुपये तिकीट दर असेल. प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०२५ अखेरीस होण्याची शक्यता आहे. प्रारंभिक टप्प्यात प्रकल्पाची सुरुवात जे पी इन्फ्रा परिसर, प्रभाग १२, १३, १८ येथील रुंद रस्त्यांवरून होणार आहे.

Comments
Add Comment