
तीन वर्षापासूनची परंपरा यंदाही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात शनिवार, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारी बसमध्ये महिलांना तिकीट न आकारण्याचा निर्णय अनेक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे.
हा मोफत बस प्रवास काही राज्यांमध्ये दोन दिवस तर काही राज्यांमध्ये तीन दिवस असणार आहे. पंजाब, कर्नाटकात महिलांसाठी बससेवा मोफत आहे. दिल्लीच्या डीटीसी बसमध्ये दिल्लीच्या महिलांनाच मोफत प्रवास करता येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि नगर बस सेवेच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याबाबतची
घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच केली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत माता व भगिनी बसमधून मोफत प्रवास करू शकतील.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी ९ ऑगस्ट रोजी व दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा १ व १० ऑगस्ट रोजी राजस्थानच्या सीमेवरील महिलांना उपलब्ध असेल.
हरियाणामध्ये रक्षाबंधनाच्या सणानिमित्त, १५ वर्षांपर्यंतच्या महिला व त्यांच्या मुलांना हरियाणा रोडवेज बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अशी माहिती हरियाणा वाहतूक मंत्री अनिल विज यांनी दिली आहे. तसेच हरियाणामध्ये धावणाऱ्या 'सामान्य बसेस' तसेच बंदिगड व दिल्लीला जाणाऱ्या बसेसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध असेल. ही सेवा ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असेल. चंदिगड, उत्तराखंड, कर्नाटक, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये तर मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात महिलांना रक्षाबंधनच्या दिनी मोफत बससुविधा आहे. तीन वर्षांपासून अनेक राज्यांनी सुरू केलेली परंपरा यंदाही कायम राहिली आहे.