Thursday, March 26, 2026

सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' कोसळला

प्रतिनिधी: शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण अपेक्षित होती. अंतिमतः ही मोठी घसरण मानली जाऊ शकते. सेन्सेक्स ४९१.५८ अंकांनी व निफ्टी ५१७.२९ अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्स मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७८%,०.४२% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.३०%,०.२१% घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ०.३०%,०.२१% घसरण झाली आहे.आज शेअर बाजारातील आंतरराष्ट्रीय दबाव कायम राहिल्याने ही घसरण झाली आहे. ट्रम्प यांनी एफटीए चर्चेवर बोलणीसही नकार दिल्याने बाजारात टेरिफचा दबाव आणखी वाढला.

आज मिडिया (०.८६%), तेल व गॅस (०.६४%) इतर क्षेत्रीय समभागात घसरण झाली आहे. आज सर्वाधिक घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स (०.८० %) समभागात झाली आहे. तर मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.७०%), आयटी (०.५०%) क्षेत्रीय समभागात दबाव पात ळी दिसून आली. बेंचमार्क निर्देशांकात ट्रेंट, बजाज फायनान्स, एनटीपीसी, हिरो मोटोकॉर्प आणि टायटन कंपनी हे शेअर्स सर्वाधिक वाढले असून दुसरीकडे, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, हिंडाल्को, एचसीएल टेक, अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स सुरूवातीच्या क लात घसरले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >