Rakhi : रक्षाबंधनासाठी २१ हजार कोटींचे मार्केट सज्ज!

राखी, मिठाई, फळे, गिफ्टमधून कोट्यवधींची उलाढाल


रक्षाबंधनाच्या आगमनाने देशभरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आणि गजबजलेल्या झाल्या आहेत. फक्त राख्याच नव्हे, तर मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रूट्स, गिफ्ट्स आणि डेकोरेशन साहित्याची खरेदीही भरभराटीत सुरू आहे. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अंदाजानुसार, यंदा देशभरात सुमारे १७००० कोटींचा राखी व्यापार होणार असून मिठाई, फळे, गिफ्ट व इतर पूरक खरेदीतून आणखी ४००० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण २१००० कोटींचा आर्थिक बूस्ट भारतीय बाजारपेठेला मिळणार आहे.


?si=gKqPTvTiDsrNq5Xn

यंदा राख्यांमध्ये इनोव्हेशनचा विशेष प्रभाव दिसतोय ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेपासून डिजिटल राखी, मोदी राखी, आत्मनिर्भर भारत, जयहिंद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा राष्ट्रभक्तीपर थीम्सना भरघोस मागणी आहे. त्याचबरोबर इको-फ्रेंडली राख्यांचा ट्रेंड जोर धरत असून माती, बीज, खादी, बांबू, कापूस यापासून बनवलेल्या राख्या खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत. या राख्या फक्त सुंदरच नव्हे तर पर्यावरणपूरकतेचा संदेशही देतात. कस्टमाइज्ड राख्यांचीही क्रेझ वाढली आहे.
भाऊ–बहिणीचे फोटो, नावे किंवा खास मेसेज कोरलेल्या राख्या लोकप्रिय होत आहेत.



देशभरातील विविध भागांतून खास राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत छत्तीसगडची कोसा राखी, कोलकात्याची जूट राखी, मुंबईची रेशमी राखी, नागपूरची खादी राखी, जयपूरची सांगानेरी राखी, पुण्याची बीज राखी, झारखंडची बांस राखी,आसामची चहा पत्ती राखी आणि बिहारची मधुबनी राखी सणाला अनोखी ओळख देत आहेत. अशा या वैविध्यपूर्ण खरेदीमुळे रक्षाबंधन हा फक्त भावंडांचा सण न राहता, परंपरा, नवकल्पना आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचा संगम बनला आहे. बाजारपेठांतील ही उत्साही गडबड सणाच्या आनंदाला आणि अर्थव्यवस्थेलाही नवीन उजाळा देते.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने

Chhatrapati Sambhajinagar Crime : इन्स्टावर ओळख, चॅटिंग अन् प्रेम; तीन मुलींच्या आईसोबत छत्रपती संभाजीनगरात घडला भयंकर प्रकार

Chhatrapati Sambhajinagar : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लोकांशी जोडण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. मात्र, याच सोशल

Ahilyanagar Crime : ​खाकीचे स्वप्न अपूर्णच राहिले ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीनं आयुष्य संपवलं

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील

Maharashtra Government : महाराष्ट्रात मोठे निर्णय! जमीन, शेती, शिक्षणासाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई: भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणाऱ्या व्याज दरांत सुधारणा. भूमिसंपादन, पुनर्वसन व