डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी वठणीवर आणणार! चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यावर्षी होणार असून, त्या दौऱ्याच्या तारखा सध्या अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी दिली आहे. डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून, गुरुवारी त्यांनी रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बोलताना अजित डोभाल म्हणाले, "भारत आणि रशियामधील संबंध हे अतिशय विशेष आणि दीर्घकालीन आहेत. या भागीदारीला आम्ही खूप महत्त्व देतो. या विशेष संबंधांमुळे गेल्या काही काळात अनेक उच्चस्तरीय भेटीगाठी झाल्या असून, त्या भेटींनी आपापल्या देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे."





ते पुढे म्हणाले, "आम्हाला हे कळून खूप आनंद झाला आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या आहेत. मात्र, त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत-रशिया दरम्यान होणाऱ्या या शिखर परिषदांना कायमच ‘वाटचाल ठरवणारे क्षण’ (Watershed moments) मानले गेले आहे." या दौऱ्यामुळे भारत-रशिया यांच्यातील रणनीतिक सहकार्य आणखी दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे आता दोन्ही देशांचे लक्ष लागले आहे.



पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार ?


पंतप्रधान मोदी ऑगस्ट अखेरीस शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनमध्ये तियानजिन येथे जाणार आहेत. हा दौरा ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. याआधीच पुतिन यांची दिल्लीत मोदींशी भेट होणार असल्याचे वृत्त आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत पण ते भारतात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

पुतिन यांचा भारत दौरा अमेरिकेच्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर


भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका नाराज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत भारतीय आयातींवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामागचे कारण म्हणजे भारताकडून रशियन तेलाची मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इतकंच नाही, तर ट्रम्प यांनी असा इशाराही दिला आहे की, "रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंध (secondary sanctions) लावले जातील, जर रशियाने युक्रेन युद्ध शुक्रवारपर्यंत थांबवले नाही." हे युद्ध आता चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे, आणि या मुद्द्यावरून रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला आहे.



पुतिन आणि ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक होणार


दरम्यान, क्रेमलिनने पुष्टी केली आहे की अध्यक्ष पुतिन आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध, व्यापार निर्बंध, आणि रशियन तेल विक्रीसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे रशियाशी वाढते आर्थिक संबंध आणि पुतिन यांचा भारत दौरा यामुळे भारताची भूराजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने याआधीही "रणनीतिक स्वायत्तता" ठेवत रशियाशी संबंध कायम राखले आहेत. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे पुढील काही आठवडे भारतासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत.

Comments
Add Comment

“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

Danish Chikna : दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटला NCB चा झटका! डोंगरीतील 'ड्रग्स फॅक्टरी' सांभाळणारा दाऊदचा खास माणूस दानिश चिकनाला गोव्यातून अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) ड्रग्स सिंडिकेटला मोठा झटका बसला आहे. दाऊदचा जवळचा हस्तक आणि