पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

  25

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.


मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरूप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली.


यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीसीचे संचालक जेनिष जॉर्ज, कर्नल संतोष घाग, लेफ्टनंट कर्नल अजय भोसले आदी उपस्थित होते.


मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने यावर्षी स्वातंत्र्यदिन समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण मिळावे या अानुषंगाने राज्यातील एनसीसीची प्रशिक्षण केंद्र वाढवून मिळावीत तसेच अधिक शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची देखील मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्यातील एनसीसीची केंद्रे, प्रशिक्षकांची संख्या, प्रशिक्षणाचे स्वरुप आदींची माहिती दिली. सध्या राज्यात सात ग्रुप्स आणि ६३ युनिट्स असून यात १,७२६ शाळा, महाविद्यालयांतील एक लाख १४ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले. लवकरच यातील १० केंद्रांचा विस्तार होऊन यात अधिकचे २० हजार ३१४ विद्यार्थी जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. शासनाकडून एनसीसीला चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए आणणार नियंत्रण

अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई : नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना