कौशल्यवाद अंगीकारण्याचे आव्हान

  58


आपल्याला उच्चशिक्षण पद्धतीत जागतिक प्रवाह आणायचे असतील, तर गुणांपेक्षा मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. शिक्षणाबाबतची पारंपरिक विचारपद्धती टाकून देऊन उच्चशिक्षण मुक्त करावे लागेल. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीही लवचिक आणि बदलत्या गरजा सामावून घेणारी असायला हवी. जागतिकीकरणाचे फायदे घेण्यासाठी जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या भाषा शिकवण्याचे काम हाती घ्यावे लागेल.


आज घडीला देश संक्रमणावस्थेतून जात आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत; ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. पण सगळेच चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे; परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल. जगात अशारितीने चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते आणि म्हणूनच या मंदीचा जास्त बाऊ करू नये. कारण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ ‘स्किल्ड मॅनपॉवर’ आपल्याकडे उपलब्ध आहे. २०३५ पर्यंत आपण एका विकसित देशाचे नागरिक असू हे नक्की आणि त्यातून आपण एका वेगळ्या मार्गाने जगावर राज्यही करू शकू. माझ्या दृष्टीने आयटी या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियाज टॅलेंट. आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही पहिल्यापासून एक मोठी समस्या मानली गेली आहे आणि त्यानुसार लोकसंख्या काबूत ठेवण्यासाठी विविध उपायही योजले गेले. इतक्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन जागतिक पातळीवर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी वापरता येईल हे फारसे कोणाला सुचले नाही.


माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, जैवतंत्रज्ञान, आरोग्य या पूर्णपणे कात टाकलेल्या किंवा नव्याने वर आलेल्या क्षेत्रांकडे नजर टाकल्यास हा फरक नक्कीच जाणवेल. याखेरीज प्रस्थापित उद्योगक्षेत्रांमध्येही धडाडीचे नवे उद्योजक येऊन अभूतपूर्व यश मिळवत आहे. मुख्य म्हणजे आजच्या या उद्योजकांना जागतिकीकरण, स्पर्धा इत्यादींची भीती वाटत नाही. उलट, पूर्वजांच्या सुरक्षित कोशांमधून आणि बंद किल्ल्यांमधून बाहेर पडून ते आज जगातल्या विविध कंपन्या धडाक्याने विकत घेत आहेत किंवा त्यांच्याशी आर्थिक-तांत्रिक सहकार्य करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. आज येथील आयटी उद्योगाच्या विस्तारामुळे भारताला आशियातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते ते उगीच नाही. यानंतर आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स तसेच तंत्रज्ञानाच्या इतर बाबींमध्ये या नवीन ज्ञान आणि उद्योगशाखांचे विस्तारीकरण सुरू होईल. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक क्षमता वाढेल आणि शिकलेल्या तरुण पिढीला रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल. दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रमाण वाढल्यास आणि सरकारी पातळीवरही पुरेसे प्रयत्न आणि वचनबद्धता दिसल्यास २०३० पर्यंत सर्व


जर्मन मालाच्या उच्च दर्जासाठी जर्मन डिझाईन आणि तंत्रज्ञान जितके कारणीभूत आहे, तितकेच तेथील कामगाराचे कौशल्य, कसब महत्त्वाचे आहे. अमेरिकन शिक्षणपद्धती कष्टाळू, बुद्धिमान आणि कर्तबगार लोकांना वाव देणारी आहे. कौशल्यप्राप्त कामगार मिळत नसल्यामुळे भारतातील मोठमोठे उद्योग, आऊटसोर्सिंग करून आणि सब-कान्ट्रॅक्ट देऊन आपले काम करून घेतात. या पार्श्वभूमावर आता विद्यार्थी नोकरीला लागणारे सर्व ज्ञान आणि कौशल्य संपादन करूनच नोकरीत शिरला पाहिजे. उद्योगसमूहांनी आपले तज्ज्ञ, शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले पाहिजेत. त्यांनी आपल्या गरजा आणि आवश्यकता निर्देशित केल्या पाहिजेत. उच्च ज्ञान आणि कौशल्य अवगत करण्यासाठी त्या क्षमतेचे आणि ध्येयवादाचे शिक्षक नेमले पाहिजेत.


अमेरिकन विद्यापीठातील शिक्षकांचा ६० ते ८० टक्के वेळ संशोधनात, संशोधन निबंध प्रकाशित करण्यात, नवीन अभ्यासात, पुस्तके लिहिण्यात जातो. ते उरलेला वेळ वर्गात शिकवण्यासाठी वापरतात. संस्थांचे रँकिंग हे तेथे होणारे संशोधन आणि त्यांचा दर्जा अशा उपक्रमांवरून ठरवला जातो. आपल्याला उच्चशिक्षण पद्धतीत हे जागतिक प्रवाह आणायचे असतील, तर गुणांना कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. शिक्षणाबाबतची, विशेषतः पारंपरिक विचारपद्धती टाकून देऊन उच्चशिक्षण मुक्त करावे लागेल.


बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीही लवचिक आणि बदलत्या गरजा वेगाने सामावून घेणारी असायला हवी. जागतिकीकरणाचे फायदे हवे असतील, तर आपल्या मुला-मुलींना जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या भाषा शिकवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल. यासाठी प्रचंड प्रमाणावर शिक्षक लागतील हे खरे आहे; परंतु आपण ई-शिक्षण, आभासी शाळा (व्हर्च्युअल क्लासरूम) अशा बाबींचा वापर करू शकतो. माहिती तंत्रज्ञान-सक्षमित शिक्षणपद्धतीचा आपल्याला मोठा उपयोग होणार आहे. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आतापर्यंत कोरलेले चित्र पुसण्याची आणखी एक पायरी आपल्याला ओलांडावी लागेल. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाल्यास शिक्षणाची किंवा शिक्षकाच्या दर्जाबाबतची फार मोठी चिंता तर मिटेलच, शिवाय शिक्षण देण्या-घेण्याच्या वेगामध्येही बदल होतील. येत्या काळात संगणकीकृत दूरशिक्षणाला मोठी मागणी येणार असून देशभरातल्या दूरदूरच्या हजारो विद्यार्थ्यांना वाजवी किमतीत उच्च शिक्षणाकडे वळणे शक्य येईल. शिकलेल्या लोकांचे आणि रोजगारांचे प्रमाण वाढले आणि त्यातून सर्वांना पैसा मिळू लागला की, भारतातल्या एकंदर सामाजिक वातावरणात फरक पडेल. एकंदरीत,


- डॉ. दीपक शिकारपूर


(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)


Comments
Add Comment

परिवर्तनाची नांदी

वार्तापत्र: मध्य महाराष्ट्र पुणे आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. किंबहुना सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच

दुरावलेला मित्र पुन्हा जवळ!

भारतापासून अतिशय जवळ आणि हिंदी महासागरात व्युहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानी असलेल्या मालदीवशी भारताचे

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या