
कालच्या दुसऱ्यांदा झालेल्या घसरणीने काल बाजारात गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले होते. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी २५% म्हणजेच एकूण ५०% टेरिफ भारतासाठी जाहीर केल्याने भारतात निर्यातदारांच्या अंतिमतः गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झा ली.डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो हीच सबब सांगत एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या करत भारतावर टेरिफ लादला. २१ दिवसांनंतर त्याची नव्या दरासहित अंमलबजावणी होणार आहे. याखेरीज क्षेत्रीय निर्देशांकातही ट्रम्प यांच्या से मीकंडक्टरवर १००%, फार्मास्युटिकल उत्पादनात २५०%, मेटल ५०% इतक्या टेरिफ वाढीमुळे भारतीय कंपन्यावर निर्यातीत दबाव निर्माण झाला आहे. युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.७३%), नासडाक (१.२१%) बाजारात वाढ झा ली व तर आशियाई बाजारातील हेगंसेंग (०.३४%), शांघाई कंपोझिट (०.१३%) इतर बाजारात वाढ झाली आहे. प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांनी ६ ऑगस्टला ४९९९ कोटींची रोख विक्री बाजारात केली असून घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) यांनी मात्र बाजारात ६७९४ कोटींची खरेदी केली. ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, शिपिंग कंपन्यांच्या शेअर्समध्येही काल घसरण कायम होती. काल डॉलरच्या तुल नेत रुपयाची पूर्वार्धात घसरण व दुपारपर्यंत रूपयांत वाढ झाली.
गुरुवारी सकाळी डॉलर निर्देशांक (DXY) ०.०४% वाढल्याने आजही डॉलरच्या किंमतीत वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. काल बँक निर्देशांकात वाढ झाली असली तरी फार्मा, आयटीसह मेटल,ऑटो, रिअल्टी समभागात मोठी घसरण झाली होती.त्यामुळे आ ज या शेअर्सवर ट्रम्प यांचा नवीन टेरिफ बॉम्बचा नवा काय परिणाम होईल यावरील शेअर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल.काल जागतिक सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली असली तरी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती.तर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) जागतिक किंमतीही काल वाढल्या होत्या ज्यामध्ये WTI Futures ०.७६%, Brent Future ०.७२% यांचा समावेश आहे. आज सकाळच्या सत्रात बँक निर्देशांकासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील, बँक निफ्टीतील हालचाल, विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) बाजार सुरू झाल्यावरच पुढील संकेत स्पष्ट करतील.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयटीआय (७.५३%), किर्लोस्कर ब्रदर्स (५.०२%), पीव्हीआर आयनॉक्स (५.०२%), लुपिन (४.४६%), बजाज होल्डिंग्स (३.७३%), फोर्टिस हॉस्पिटल (३.३३%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.६१%), सुंदरम फायनान्स (२.०१%) नेटवेब टेक्नॉलॉजी (२.२७%), होनसा कंज्यूमर (२.०८%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (१.७३%), अजंता फार्मा (१.२८%) औरबिंदो फार्मा (१.००%), माझगाव डॉक (०.७४%), बजाज हाउसिंग (०.४५%), गोदरेज कंज्यूमर (०.३८%), हिंदुस्थान झिंक (०.३२%)समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जीएनएफसी (५.५५%), भेल (४.०२%), एसकेएफ इंडिया (३.१५%), जिंदाल स्टील (३.९५%), किर्लोस्कर ऑईल (२.५८%), सफायर फूडस (२.५४%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.४८%), रेमंड (२.०२%), बेअर कॉर्पोरेशन (२.१४ %), तानला (२.१२%), वेलस्पून लिविंग (१.७९%), इमामी (१.४८%), पीएनबी हाउसिंग (१.०१%), जस्ट डायल (१.०१%), इंडिया सिमेंट (०.९८%),रेडिको खैतान (०.९२%), रेल विकास (०.८५%),जेल इंडिया (०.८४%), वेदांता (०.७९%), जिओ फायनांशियल (०. ०६%), एचडीएफसी बँक (०.११%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' अतिरिक्त २५% कर लागू होण्यासाठी २१ दिवसांची मुदत असल्याने अमेरिकेसोबत वाटाघाटी आणि अंतिम करारासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु व्यापार धोरणाबाबत आणि दोन्ही देश किती प्रमाणात तडजोड करण्यास तयार असतील याबद्दल मोठी अनिश्चितता आहे. युरोपियन युनियनसह इतर देशांसोबतच्या करारांमध्ये मिळालेल्या यशामुळे ताजेतवाने झालेले राष्ट्रा ध्यक्ष ट्रम्प त्यांच्या अन्याय्य भूमिकेतून फारसे मागे हटण्याची शक्यता नाही. दुर्दैवाने भारतासाठी, अमेरिका ताकदीच्या स्थितीतून सौदेबाजी करत आहे. भारताचा प्रतिसाद परिपक्व आणि मोजमाप केलेला आहे. बाजार घाबरण्याची शक्यता नाही परंतु नजीकच्या काळात कमकुवतपणा कायम राहील. अनिश्चितता जास्त असल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्या दृष्टिकोनात सावधगिरी बाळगली पाहिजे. किमान नजीकच्या काळात निर्यात-केंद्रित क्षेत्रे कमकुवत राहतील. बँकिंग आणि वित्तीय, दूरसंचार, हॉटेल्स, सिमेंट, भांडवली वस्तू आणि ऑटो मोबाईलचे विभाग यासारख्या देशांतर्गत वापराच्या थीम लवचिक (Flexible) राहतील.'
सकाळच्या सत्रातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,' जरी अलिकडच्या काळात नीचांकी पातळी लक्षणीयरीत्या कमी झालेली नसली तरी, उच्चांक पद्धत शीरपणे कमी राहिले आहेत, जे अस्वलांच्या (Bear Impact) वर्चस्वाचे प्रतिबिंब आहे. गती तीव्र घसरणीला अनुकूल नसली तरी, तोटा कायम राहू शकतो (२४०८०-२३५६०) चे लक्ष्य ठेवून पर्यायीरित्या २४५९० पातळीच्या वर तरंगण्याची क्षमता आपल्याला वरच्या शक्यतांचा विचार करण्यास प्रोत्साहित करेल, जरी पुनर्प्राप्तीची पुष्टी करण्यासाठी २४६७० च्या वर धक्का शोधणे शहाणपणाचे ठरेल.'
त्यामुळे सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक मर्यादित पातळीवर असला तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजारात कशा प्रकारे प्रतिसाद देत हे चित्र दुपारी १ नंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कसे असले तरी क्षेत्रीय निर्दे शांक, बँक निफ्टी, निफ्टी यासह मिड व स्मॉलकॅप शेअर्सवर लक्ष केंद्रित करणे निर्णायक ठरू शकते.