मंत्री आशिष शेलार यांनी एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती नेमण्याचे दिले निर्देश

मुंबई : मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित खात्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले.


महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृह यांची अवस्था दयनिय असून या चित्रपटगृहाबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अथवा अनुदान द्यावे अथवा अन्य मदत करावी या मागणीसाठी विविध संस्था आणि चित्रपटगृह मालक, चालक संघटनेना, कलावंत, चित्रपट निर्माते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना विविध निवेदन दिली होती. त्याबाबत आज मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य विभाग, गोरेगाव फिल्म सिटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला चित्रपट गृह मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी त्यांनी सांगितले की, नगरविकास, गृह, महसूल,. वित्त आणि सांस्कृतिक कार्य विभाग व या क्षेत्रातील तज्ञ यांची संयुक्त समिती गठीत करुन याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर करण्यात यावा तसेच जी 300 चित्रपट गृहे सुरु आहेत तसेच जी बंद आहेत अशा सर्व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये मराठी सिनेमा दाखवण्यात येणार असेल तर त्यासाठी काही शासन प्रोत्साहन योजना आणू शकते का? याचा ही विचार या समितीने करावा, अशा सूचना ही मंत्री शेलार यांनी दिल्या.


दरम्यान, गोरेगाव मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या विषयावर ही बैठक घेण्यात आली. अभिनेते सुनील बर्वे आणि गोरेगावचे नागरिक या नाट्यगृहांसाठी आग्रही असून यासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली होती. या प्रश्नावर महापालिका अधिकारी आणि संबधीत कलावंत व स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंत्री शेलार यांनी आढावा घेतला. उपलब्ध जागा तसेच प्रस्तावित इमारतीबाबत कलावंताचे म्हणणे या सगळ्याचा विचार करुन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण अहवाल सादर करा व लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.


तसेच आज लावणी कलावंताच्या प्रश्नाबाबत ही बैठक घेऊन त्यांच्या समस्या मंत्री शेलार यांनी समजून घेतल्या.

Comments
Add Comment

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी

अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी

मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मध्ये राधा पाटीलचा मोठा खुलासा; तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिप कबुली

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि

२०२६ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला (शनिवार/रविवार) ओटीटी वर येणारे प्रोग्राम

या प्रजासत्ताक दिनी, धैर्य, न्याय, ओळख आणि बदल दर्शविणाऱ्या कथा पुन्हा एकदा पाहून स्वातंत्र्याचा सन्मान करूया.

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद