Thursday, August 7, 2025

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रकनिर्गमित करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारी, दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारी, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन  परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी  दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) (दि. १६ ऑगस्ट, २०२५) व अनंत चतुर्दशी (दि. ०६ सप्टेंबर, २०२५) या ऐवजी नारळी पौर्णिमा (दि. ०८ ऑगस्ट, २०२५) व ज्येष्ठगौरी विसर्जन (दि. ०२ सप्टेंबर, २०२५) निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >