
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे जवान घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने २ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आणि सर्व जखमी जवानांना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक प्रशासन व सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सुरक्षा दलामध्ये शोककळा पसरली असून, अपघाताबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्यायाम करत ...
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनाने १८ जवानांना घेऊन कडवा येथून बसंतगडकडे कूच केली होती. मात्र सकाळी सुमारे १०:३० वाजता ट्रकचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले. या हृदयद्रावक घटनेत दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उधमपूरचे स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.
BREAKING:
A #CRPF vehicle was involved in a tragic accident today after it lost control and plunged into a deep gorge on the Khander–Kudwa road near Basantgarh.
Rescue operations are currently underway at a rapid pace, with emergency teams rushing to the scene.
Boeing… pic.twitter.com/BCeoYXbzzD
— ALKA MANDAL (@Alka_Mandall) August 7, 2025
स्थानिकांनी दाखवली माणुसकी
उधमपूरमधील सीआरपीएफ वाहनाच्या भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन घडवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. दुर्घटनेनंतर बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आलं असून, घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमी जवानांना बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, “सीआरपीएफ वाहनाच्या अपघाताची बातमी ऐकून मला अत्यंत दु:ख झालं आहे. या वाहनात आपले अनेक शूर जवान होते. बचावकार्य वेगाने सुरू असून स्थानिक लोकांनीही स्वतःहून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” या मानवी भावनेच्या प्रत्ययामुळे संकटाच्या प्रसंगी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं उदाहरण दिसून आलं आहे.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची शोकभावना
Union Minister Dr Jitendra Singh tweets, "Udhampur: Disturbing to receive the news of a road accident involving a CRPF vehicle in the Kandva–Basantgarh area. The vehicle was carrying several brave jawans of the CRPF. I have just now spoken to DC Saloni Rai, who is personally… pic.twitter.com/qQm6JY7SPk
— ANI (@ANI) August 7, 2025
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफच्या ट्रकला भीषण अपघात होऊन दोन जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यावर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टद्वारे त्यांनी लिहिलं की, “सीआरपीएफच्या जवानांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.” या दुर्घटनेबद्दल देशभरातून सहवेदना व्यक्त होत असून जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत पुरवली जात आहे.