Friday, August 29, 2025

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही लोक एका कारमध्ये बसून कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. याच गोल्डी ढिल्लो नावाच्या एका गँगस्टरने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून दावा केला की हल्ला गिरोहने केला आहे.

दरम्यान, या गोळीबारा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक पोलिसानी तपास सुरू केला आहे. कपिल शर्माकडून आतापर्यंत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

गोल्डी ढिल्लो स्वत:ला लाँरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगतो. फायरिंगच्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्टच्या सकाळी साधारण ४.४० वाजता न्यूटन परिसराच्या १२० स्ट्रीट स्थित व्यावसायिक परिसरात गोळ्यांचा आवाज ऐकू आला. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना कॅफेच्या खिडक्या आणि इमारतीत गोळ्यांचे निशाण सापडले. दरम्यान, कॅफेच्या आतील स्टाफला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. याच ठिकाणी १० जुलैलाही गोळीबाराची घटना घडली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >