Gold Silver Rate Today: सोन्यात सलग सातव्यांदा आणि चांदीत सलग तिसऱ्यांदा वाढ सोन्यात आणखी एक उच्चांक

  30

प्रतिनिधी: सोन्यात सलग सातव्यांदा आणि चांदीत सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. बाजारातील अस्थिरतेचा परिपाक म्हणून सोने प्रति तोळा १०२५५० रूपयांवर पोहोचले आहे. जागतिक टेलवाईंडचा परिणाम म्हणून सोन्याच्या व चांदीच्या स्पॉट मागणीत मोठी वाढ झाली ज्यात सोन्याच्या गुंतवणूकीत वाढलेली मागणी पाहता निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२ रूपये, २२ कॅरेटच्या प्रति ग्रॅम दरात २० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्र ति ग्रॅम दरात १६ रूपये वाढ झाली. परिणामी सोन्याच्या प्रति ग्रॅम किंमत अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०२५५, २२ कॅरेटसाठी ९४०००, १८ कॅरेटसाठी ७६९१ रूपयांवर पोहोचल्या आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति तोळा किंमतीत २२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति तोळा दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०२५५०, २२ कॅरेटसाठी ९४०००, १८ कॅरेटसाठी ७६९१० रूपयांवर पोहोचली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या जागतिक निर्देशांकात आज वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.६१% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये ०.१३ % वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची एमसीएक्स दरपातळी १०१३९१ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक मानक असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.४०% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३३८३.५३ औंसवर गेली आहे. संकेतस्थळावरील भारतातील मुंबई सह प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२५५,२२ कॅरेटसाठी ९४०० रूपये,१८ कॅरेटसाठी ७७६० रूपयांवर पोहोचले आहेत. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीच्या सत्राने बाजार हादरले असताना आता सोने व कच्च्या तेलात दबाव निर्माण झाला. आजही संध्याकाळपर्यंत डॉलर निर्देशांकात ०.०५% वाढ झाली आहे. सातत्याने डॉलर वाढल्याने बास्केट मधील इतर चलनात घसरण होत आहे ज्याचा फटका भारतात होत आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमतीत किरकोळ वाढ झाली असली तरी भारतातील सोन्याच्या मोठ्या मागणीचा परिणाम म्हणून सोने महाग झाले आहे.


चांदीच्या दरातही सलग तिसऱ्यांदा वाढ -


चांदीच्या दरातही सलग तिसऱ्यांदा आज वाढ झाली आहे. वाढलेली औद्योगिक मागणी, वाढलेले स्पॉट खरेदी विक्री, याशिवाय बाजारातील घटलेल्या पुरवठ्यामुळे ही वाढ झाली आहे. जागतिक चांदीच्या निर्देशांकात आज मोठी वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत चांदीच्या जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात तब्बल १.५४% वाढ झाली आहे. तर भारतीय बाजारपेठेतील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात ०.९७% वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीची दरपातळी ११४७५७ रूपयांवर पोहोचली. आजच्या चांदीचे दर 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति ग्रॅम १ रूपयांनी वाढ झाल्याने दर ११७ रूपयांवर गेले तर प्रति किलो दरात १००० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी ११७००० रूपयांवर गेली. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीची सरासरी दर पा तळी प्रति १० ग्रॅमसाठी १२७० रूपये, तर प्रति किलोसाठी १२७००० रुपयांवर आहे.

Comments
Add Comment

वसई-विरार भागातील चार उड्डाणपुलाच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या

काम करा, अन्यथा फेरबदल होणार : शिंदेंचा मंत्र्यांना इशारा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो, महिला आयोगाचा धक्कादायक खुलासा

पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

डॉक्टरांपेक्षा एक रुपया अधिक पगार पाहिजे; आत्मसन्मानासाठी मुंबईचे 'सफाई कर्मचारी' सरसावले!

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले मनपाचे सफाई कर्मचारी आता केवळ झाडू न मारता,