
मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो एक आयटी प्रोफेशनल आहे, त्याच्याविरुद्ध खोट्या बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे. खोट्या तक्रारीसोबतच, 'ना हरकत' स्टेटमेंटच्या बदल्यात त्याच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही तिच्यावर आहे.

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी झाली आहे. यामुळे महाराष्ट्र तेलंगणा, ...
आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत मिळून कोटकने पीडिताची खासगी माहिती मिळवली. त्याच्या कुटुंबीयांना धमकावले आणि त्याला तुरुंगात पाठवून त्याची नोकरी गमावण्यास कारणीभूत ठरल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिच्या भाऊ सागर कोटकसह सहा जणांविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सागर कोटक सध्या दुसऱ्या एका प्रकरणात जामिनावर बाहेर आहे.