Thursday, August 7, 2025

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी वेळापत्रक घोषित

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी वेळापत्रक घोषित

आवश्यकता भासल्यास ९ सप्टेंबर रोजी मतदान

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने भारताच्या विशेष राजपत्रात आज ७ ऑगस्ट रोजी प्रकाशित अधिसूचनेद्वारे, उपराष्ट्रपती पद निवडणुक 2025 साठी खालील वेळापत्रक निश्चित केले आहे.

(a) 21 ऑगस्ट 2025 नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख; (b) 22 ऑगस्ट 2025 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी; (c) 25 ऑगस्ट 2025 ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख; आणि (d) 9 सप्टेंबर, 2025 या दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान घेतले जाईल.

आयोगाने 25 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या स्वतंत्र अधिसूचनांद्वारे, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे आणि सहसचिव गरिमा जैन आणि राज्यसभा सचिवालयाचे संचालक विजय कुमार यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली , 1974 च्या नियम 3 अंतर्गत आवश्यकतेनुसार,निवडणूक अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सूचनेद्वारे आज, 7 ऑगस्ट, 2025 रोजी अधिसूचित केले आहे की-

(i) नामनिर्देशनपत्र, उमेदवार किंवा त्याच्या प्रस्तावक किंवा अनुमोदकांपैकी कोणीही निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या खोली क्रमांक आरएस-28, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथील कार्यालयात किंवा ते अपरिहार्य कारणामुळे गैरहजर असल्यास, सहाय्यक निवडणूक अधिकारी सहसचिव गरिमा जैन आणि राज्यसभा सचिवालयाचे संचालक विजय कुमार यांच्याकडे सदर कार्यालयात कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सादर करता येतील. मात्र 21 ऑगस्ट 2025 नंतर सादर करता येणार नाही.

(ii) प्रत्येक नामनिर्देशनपत्रासोबत ज्या संसदीय मतदारसंघात उमेदवार मतदार म्हणून नोंदणीकृत आहे त्या मतदार यादीतील उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत असावी;

(iii) प्रत्येक उमेदवाराने पंधरा हजार रुपये जमा करावेत . ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्र सादर करताना रोख स्वरूपात किंवा आधी भारतीय रिझर्व्ह बँकेत किंवा सरकारी तिजोरीत जमा केली जाऊ शकते.आणि नंतर नामनिर्देशनपत्रासोबत ही रक्कम जमा केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे;

(v). कायद्याच्या 5 B कलमाअंतर्गत उपकलम 4च्या अन्वये नाकारण्यात आलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर नामनिर्देशनपत्र छाननीसाठी वरील कार्यालयात खोली क्र . F-100 संगोष्टी-2, पहिला मजला संसद भवन नवी दिल्ली येथे सोमवार 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता छाननीसाठी घेतले जातील.

(vi). उमेदवारीतून माघार घेण्याची सूचना स्वतः उमेदवार किंवा त्याच्या प्रस्तावक किंवा अनुमोदकाकडून, जे उमेदवाराच्या वतीने यासाठी अधिकृतपणे लेखी स्वरूपात नियुक्त केले असतील त्यांच्याकरवी देता येईल. ही सूचना वरील परिच्छेद 1 मध्ये दिलेल्या पत्त्यावर 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याचे आत द्यावी.

(vii) या निवडणुकांसाठीचे मतदान मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदानाच्या ठिकाणी नियमानुसार घेतले जाईल.

या अधिसूचनेचे आणि निवडणूक अधिकारीद्वारे जारी सार्वजनिक सूचनेचे एकाच वेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकृत राजपत्रात प्रकाशन करण्याची व्यवस्था केली आहे.

निवडणूक प्रक्रियेबद्दल आणखी शंका असल्यास त्यासाठी उपराष्ट्रपतीं पदाची निवडणुक 2025 साठीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी सी मोदी यांना खोली क्र. आरएस 8 तळमजला संसद भवन नवी दिल्ली येथे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या कालावधीत म्हणजेच 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2025 या काळात सार्वजनिक सुट्ट्या वगळता शनिवारसह सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत भेटता येईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >