
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६३) यांचा त्यांच्याच राहत्या घरी खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उघडकीस येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सध्या खुनामागचं नेमकं कारण समजलेलं नसून, प्राथमिक स्वरूपाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासले जात आहेत. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून, लवकरच आरोपीचा शोध घेऊन तपास पूर्ण केला जाईल, असं आश्वासन पोलिस प्रशासनाने दिलं आहे.

गुजरात : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील टल्ली गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात, ३२ वर्षीय शेतकऱ्याने जंगलात एका सिंहाच्या खूप जवळ जाऊन त्याचा छळ ...
CCTV हार्ड डिस्क गायब
सेवानिवृत्त शिक्षिका आपल्या घरात विवस्त्र अवस्थेत मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी चिपळूणच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे, घरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्याची हार्ड डिस्क गायब असल्याचं समोर आलं आहे, ज्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.
हल्लेखोरांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत कटपूर्वक हा गुन्हा केल्याचं स्पष्ट होत असून, आरोपींना ओळखणे व पकडणे हे चिपळूण पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. या हत्येचं नेमकं कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे.