Thursday, August 7, 2025

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा


मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे १८ विशेष ट्रेन चालवणार आहे.




  • १) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ट्रेन - ०११२३ विशेष ट्रेन ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथून रात्री १२ . २० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३. ३० वाजता पोहोचेल, तर ०११२४ विशेष ट्रेन १० ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी २ . ३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल.

  • २) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ट्रेन - ०२१३९ विशेष ट्रेन १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३. ३० वाजता पोहोचेल. तर ०२१४० विशेष ट्रेन १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथून तरी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.

  • ३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर विशेष ट्रेन-०१४१७ विशेष ट्रेन ८ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथून तरी १०. ३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता पोहोचेल. ०१४१८ विशेष ट्रेन १० ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून संध्याकाळी ४. ४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.४५ वाजता पोहोचेल.

  • ४) लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई-मडगाव विशेष ट्रेन - ०११२५ विशेष ट्रेन १४ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४५ वाजता पोहोचेल. ०११२६ विशेष ट्रेन १५ ऑगस्ट रोजी मडगाव येथून दुपारी १. ४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.

  • ५) लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई-मडगाव विशेष- ०११२७ विशेष ट्रेन १६ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०. १५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. ०११२८ विशेष ट्रेन १७ ऑगस्ट रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.

  • ६) पुणे-नागपूर विशेष ट्रेन - ०१४६९ विशेष ट्रेन ८ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळी ७ .५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २. ४५ वाजता पोहोचेल. ०१४७० विशेष ट्रेन १० ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता पोहोचेल.

  • ७) पुणे-नागपूर विशेष ट्रेन - ०१४३९ विशेष ट्रेन १४ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळी ७. ५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. ०१४४० विशेष ट्रेन १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ४. १५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ७.२० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा