Wednesday, August 6, 2025

Stock Market: सकाळी शेअर बाजारात 'बल्ले बल्ले' सेन्सेक्स निफ्टी उसळला, MPC व्यतिरिक्त हे आजचे विश्लेषण!

Stock Market: सकाळी शेअर बाजारात 'बल्ले बल्ले' सेन्सेक्स निफ्टी उसळला, MPC व्यतिरिक्त हे आजचे विश्लेषण!
मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात 'बल्ले बल्ले' वाढ झाली आहे. सकाळी बाजार सुरु होण्यापूर्वीच गिफ्ट निफ्टीत वाढ झाली होती. सकाळी ९.३० वाजता सत्र सुरू होतानाच सेन्सेक्स १५ अंकाने व निफ्टी ५ अंकाने वाढला आहे. सका ळी ८.२० वाजता गिफ्ट निफ्टीत ०. २५% वाढ झाल्याने आजही दिवसभरात वाढीचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही शेअर बाजारात वाढ झाल्याने या वाढीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बाजारात वाढ झाली असली तरी देखील ट्रम्प यांच्या धमकीने आज फार्मा व टेक्सटा ईल शेअर्समध्ये लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. काल उशीरा ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टेरिफ कर लावू अशी घोषणा केली होती. सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सेन्सेक्स बँक निर्देशां कात ०.२४%, बँक निफ्टी निर्देशांकात ०.०९% वाढ झाल्याने बाजारातील आश्वासकता वाढल्याचे यातून अधोरेखित होते. यामुळे सातत्याने घसरलेल्या फायनांशियल सर्व्हिसेस व बँकेच्या निर्देशांकात अखेरच्या सत्रापर्यंत वाढ होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये कालप्रमाणे अनुक्रमे ०.६७%,०.८२% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६९%,०.८७% घसरण झाली आहे. विशेषतः वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.८३% उसळला आहे प्रामुख्याने आरबीआयच्या निर्णयानंतर निर्देशांकात दुपारनंतर बदल अपेक्षित आहे. रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नसल्याने आम्ही भारतावर २५% पेक्षा अधिक कर लावणार आहोत असे प्रसारमाध्यमांना म्हटले. त्यामुळेच काल शेअर बाजारातही घसरण झाली होती.

किंबहुना अमेरिकेतील शेअर बाजारातही काल घसरणीचेच वारे वाहू लागले. काल युएस बाजार बंद होताना डाऊ जोन्स (०.३२%) बाजारातील वाढ वगळता एस अँड पी ५०० (०.४९%), नासडाक (०.६५%) बाजारात घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सर्वात महत्त्वाचा ट्रिगर म्हणजे आज आरबीआयकडून लागणारा वित्तीय पतधोरण समितीची निकाल आहे. आज सकाळी १० वाजता आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा वित्तीय पतधोरण समितीचा (Monetary Policy Committee MPC) निकाल घोषित करतील. ज्यामध्ये रेपो दराविषयी बाजाराला निश्चिततेचा 'ट्रिगर' मिळणार आहे. या संकेतानंतर बाजारातील आजचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.

अर्ध्याहून अधिक तज्ञांच्या मते आरबीआयकडून व्याजदरात कपात होऊ शकते मात्र काही तज्ञांच्या मते बाजारात युएस टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर 'न्यूट्रल' स्टान्स देखील घेतला जाऊ शकतो. म्हणजेच आरबीआय व्याजदर तसेच ठेऊ शकतील. त्यामुळे आरबी आय गव्हर्नर आपले काय मनोगत व्यक्त करतात त्यावर बाजारातील पुढील ठोकतांळ्याचा उलगडा होऊ शकतो. युएस मधील रोजगार आकडेवारी कमकुवत असल्याने युएस बाजारात मंदीचे संकेत मिळत आहेत. मात्र वाढलेल्या टेरिफमुळे आगामी दिवसात अ मेरिकेतील निर्यात महसूलाची आकडेवारी तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदराची निश्चिती यांचाही विचार बाजारात केला जाऊ शकतो. सध्याची बदललेली समीकरणे लक्षात घेत आरबीआय आपला निकाल जाहीर करू शकते. विशेषतः रुपयात सातत्याने घसरण होत असल्याने काल भारतीय रूपया १६ ते १९ पैशाने घसरल्याने रूपयानेही ८७.७ हा नवा निचांकी आकडा गाठला आहे. त्यामुळे बाजारात तरलता (Liquidity) आवश्यक असल्यानेही आरबीआयकडून दरकपात करण्याचीही शक्यता आहे.तसे झाल्यास भारतीय गुं तवणूकदारांसोबत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक आणखी वाढू शकते.

काल आशियाई बाजारातील मध्ये संमिश्र प्रतिसाद कायम होता तो आजही कायम राहण्याची शक्यता आहे. सकाळी ९.३९ वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टीत पुन्हा ०.२०% घसरण झाली असून निकेयी २२५(०.७०%), सेट कंपोझिट (०.८७%), जकार्ता कंपोझिट (०.२३%) बाजारात वाढ झाली असून कोसपी (०.२६%), तैवान वेटेड (०.७८%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%) बाजारात घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ सारेगामा इंडिया (६.७७%),गॉडफ्रे फिलिप्स (५.१२%), आयटीआय (४.६४%), किर्लोस्कर ऑईल (३.९४%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.१९%), आयआयएफएल फायनान्स (२.७४%), जिलेट इंडिया (२.१७%), स्विगी (१.०१%), भारती एअरटेल (०.७६%) श्रीराम फायनान्स (०.५२%), आयसीआयसीआय बँक (०.४३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (०.४३%) समभगात झाली.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण सीसीएल प्रोडक्ट (८.०१%), गोदावरी पॉवर (५.३५%), एसआरएफ (२.५७%), हिताची एनर्जी (२.४६%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.८६%), बीएसई (१.७५%), क्रिसील (१.२६%), विप्रो (१.०९%) आयडीबीआय बँक (०.२५%), एचडीएफसी बँक (०.०२%) समभागात झाली.

सकाळच्या सत्रावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' राष्ट्रपती ट्रम्प यांचे भाषण आणि कृती नजीकच्या काळात बाजारांवर परिणाम करत राहतील.आतापर्यंतच्या भाषण आणि कृतींना भारताचा प्रतिसाद कमी आणि अलिकडच्या काळात मजबूत आणि मोजमापाने दिला गेला आहे.अमेरिकन प्रशासनाच्या अन्याय्य आणि अवास्तव मागण्या भारत मान्य करण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ असा की कमी निर्यातीच्या बाब तीत अर्थव्यवस्थेला अल्पकालीन त्रास होईल आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये आपल्या जीडीपी वाढीला किरकोळ फटका बसेल, जीडीपी वाढ आधीच्या अंदाजानुसार ६.५% वरून सुमारे ६.२% पर्यंत घसरेल. कॉर्पोरेट उत्पन्नालाही किरकोळ फटका बसू शकतो. या चा अर्थ बाजारासाठी अल्पकालीन त्रास, विशेषतः उच्च मूल्यांकनांमुळे सुधारणांना वाव मिळतो. गुंतवणूकदार दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी मोठ्या आणि मिडकॅप विभागातील उच्च दर्जाचे स्टॉक खरेदी करण्यासाठी घसरणीचा वापर करू शकतात.आजच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयाचा बाजारावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नाही. बाजारावरील व्यापक प्रभाव ट्रम्पच्या नाराजीचा असेल.'

त्यामुळे आज बाजारात आरबीआयच्या निकालासोबत टेरिफमधील जागतिक घडामोडीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणूकीच्या दृष्टीने क्षेत्रीय विशेष समभागातील कामगिरी गुंतवणूकदारांसाठी निर्णायक कामगिरी बजावेल असा अंदाज आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >