
कंपनीला अखेरपर्यंत एकूण सरासरी ४१.०२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. ज्यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Buyers QIB) यांच्याकडून सर्वाधिक १०३.९७ वेळा, त्यानंतर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non I nstitutional Investors NII) ३४.९८ वेळा, किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) ७.७६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. तर कंपनीच्या (Depository) स्वतः चा कर्मचाऱ्यांक डून कंपनीला १५.३९ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. सकाळी सूचीबद्ध झा ल्यानंतरच कंपनीच्या शेअर्समध्ये १०% पेक्षा अधिक वाढ झाली होती. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत इतके चांगले सबस्क्रिप्शन एनएसडीएल आयपीओला मिळाल्याने वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूकदार आश्वस्त झाले आहेत.
२०१२ साली स्थापन झालेली एनएसडीएल ही देशातील सीडीएसएल (CDSL) सहभारतात सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते. सिक्युरिटीजच्या वाटप आणि मालकी हस्तांतरणाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवते. तसेच डिमटेरियलायझेशन (Dematerialisat ion) ट्रेड सेटलमेंट,ऑफ-मार्केट ट्रान्सफर, सिक्युरिटीजचे प्लेजिंग (Pledging of Securities) आणि कॉर्पोरेट अँक्शन्ससह डिपॉझिटरी सेवा प्रदान करते.