चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश, मिनिटाला ६० गोळ्या झाडणार

बीजिंग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या रोबोसोबत युद्धसराव केला आहे. एका मिनिटाला हा लांडगा रोबो ६० गोळ्या झाडताना दिसून आला आहे. म्हणजेच एका सेकंदाला एक गोळी हा लांडगा झाडत होता.


मीडिया रिपोर्टनुसार, चिनी सैन्याने (पीएलए) आपल्या पथकात एका रोबोटिक लांडग्याचा समावेश केला आहे. या लांडग्याबाबत आणखी एक बाब म्हणजे हा लांडगा बर्फावरून, उंच डोंगरावरून आरामात चालत जाऊ शकतो. म्हणजेच हा लांडगा जिथे सैनिक सहज पोहोचू शकणार नाहीत तिथे जाऊन शत्रूला मिनिटाला ६० गोळ्या झाडून संपवू शकणार आहे. अशा प्रकारची शस्त्रांचा सामना कसा करायचा याची शत्रूला माहितीही नसणार आहे.


या लांडग्यामध्ये लांडग्याच्या आत QBZ-191 असॉल्ट रायफल बसवण्यात आली आहे. रोबोटिक लांडग्याचे वजन सुमारे ७० किलो आहे. दुर्गम भागात लढण्यासाठी चिनी सैनिक कमकुवत आहेत. यामुळे चीनने या लांडग्याची निर्मिती केली आहे. चीनचे सध्या जपान, फिलीपिन्स, तैवान, भारत यासारख्या देशांशी वैर आहे. यामुळे चीन आपले सैन्य हायटेक करण्यात गुंतलेला आहे.


एकीकडे आजची युद्धे हायटेक होत चालली आहेत. अशातच चीनने सैन्यासोबत लांडग्याच्या रुपातील रोबो आणल्याने आता ही युद्धे कोणत्या पातळीवर जाऊन लढली जातील याची कल्पनाही धडकी भरवणारी आहे.

Comments
Add Comment

मादागास्करमध्ये जेन-झीच्या आंदोलनाने सरकार हादरले, राष्ट्रपतींचे देश सोडून पलायन

अँटानानारिवो : नेपाळनंतर आता आफ्रिकन देश मादागास्करमध्ये जेन-जी च्या उग्र आंदोलनाने वातावरण

बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमधील एक कपडा कारखाना आणि केमिकल गोदामात भीषण आग लागली. ही घटना मीरपूरच्या रूपनगर भागातील आहे. या

२०२६ मध्ये 'कॅश क्रश'मुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार? 'कॅश क्रश' म्हणजे काय?

बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी; तिसरे महायुद्ध आणि एलियनच्या संपर्काचीही चर्चा 'बाल्कनच्या नोस्ट्रेडॅमस'च्या

हमासच्या कैदेतून सर्व २० इस्राायली ओलिसांची सुटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये सुरू केलेल्या शांतता योजनेला यश आले आहे. इस्रायल आणि

अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा

Influenza : मोठं संकट! टोक्योमध्ये १३० हून अधिक शाळा बंद, थेट महामारीची घोषणा, भारतासह आशियासाठी धोक्याची घंटा?

टोकियो : करोना महामारीच्या (Corona Pandemic) धक्क्यातून जग सावरत असतानाच, आता आणखी एका मोठ्या संकटाचे सावट घोंघावताना दिसत