Wednesday, August 6, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आजही घसरगुंडीच ! टेरिफशिवाय फार्मा, रिअल्टी शेअर्सनेही बाजाराला लोळवले !

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आजही घसरगुंडीच ! टेरिफशिवाय फार्मा, रिअल्टी शेअर्सनेही बाजाराला लोळवले !

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेर घसरगुंडीनेच झाली आहे. अखेरचे सत्र रेपो दर निकालांच्या प्रभावाने व्याकुळ झाले असून शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी साफ नकारात्मकता दर्शविली आहे. सेन्सेक्स १६६.२६ अंकांने घसरून ८०५४३ .९९ पातळीवर व निफ्टी ५० ७५.३५ अंकाने घसरत २४५७४.२० पातळीवर स्थिरावला आहे. सकाळप्रमाणेच सेन्सेक्स बँक व बँक निफ्टी निर्देशांकात वाढ झाली‌. प्रामुख्याने बाजारातील काही आश्वस्त तिमाही निकाल, तसेच मजबूत विशेष पीएसयु बँकिंग शेअर्सम ध्ये असलेले फंडामेंटल यामुळे ही वाढ झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६३.८५ अंकाने व बँक निफ्टी आज ५०.९० अंकाने वाढला आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.००%,१.१४% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८०% ,१.१३% घसरण झाली आहे जी सकाळीही कायम होती. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये पीएसयु बँक (०.५९%) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरणच झाली. सर्वाधिक घसरण मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.९०%),मिड स्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.४०%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.२९%), हेल्थकेअर (१.२९%), रिअल्टी (१.५१%), फार्मा (२.०३%) समभागात झाली.


कालच्या ट्रम्प यांच्या अतिरिक्त टेरिफमधील धमकीनंतर आज आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीने रेपो दर स्थिर ठेवला.ज्यामध्ये रेपो रेट ५.५०% पातळीवर कायम ठेवला गेला. त्यामुळे आगामी काळात रेपो व्याजदरात कपात न झाल्याने कर्जाचे हप्ते कमी होणार नाहीत हे स्पष्ट झाले. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरखरेदी करण्याच्या ग्राहकांच्या आनंदाला विरजण लागले.आरबीआयने आज न्यूट्रल स्टांन्स (Neutral Stance) घेतल्याने बाजारात दुपारच्या सत्रात संवेदनशील शेअर्समध्ये त्याचा परिणाम जाणवला आ हे. ज्याचा सर्वात अधिक फटका फार्मा, रिअल इस्टेट शेअर्समध्ये बसला आहे. विशेषतः सकाळच्या सत्रातील किरकोळ वाढलेला अस्थिरता निर्देशांक (VIX) २.११% उसळल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकले नाही. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही आज घसरण झाली. तसेच टेरिफ प्रकरणामुळे मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये सुरु असलेल्या घसरणीचा एकत्रित परिणाम म्हणून बाजार कोसळले. विप्रो, सन फार्मा, जिओ फायनांशियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, इन्फोसिस अशा हेवी वेट शेअरमध्ये घसरण आज झाली. ज्याचा परिणाम निर्देशांकात दिसला. एक मजबूत फंडामेंटल असल्याने आज होणारी मोठी घसरण रोखली गेली आहे. याचे आणखी प्रमुख कारण म्हणजे एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया अशा शेअर्समध्ये आज झालेली वाढ नुक सान मर्यादित करण्यास कारणीभूत ठरली.


आज बीएसईत ४२०४ समभगापैकी १३४७ समभागात वाढ झाली असून २७०५ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत ३०७१ समभागापैकी ८४६ समभागात वाढ झाली असून २१२८ समभागात घसरण झाली. आज एनएसईत ९५ शेअर लोअर सर्किटवर (Low er Circuit) कायम राहिले आहेत. याशिवाय आज जाहीर झालेल्या बहुतांश कंपनीच्या तिमाहीतील कमजोर निकालानेही गुंतवणूकदार निराश झाल्याची शक्यता आहे. आज मोठ्या संख्येने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी दुपारी सकाळप्रमाणेच सेल ऑफ केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.०५%), निकेयी (०.६२%), स्ट्रेट टाईम्स (०.४५%), सेट कंपोझिट (१.३८%) बाजारात वाढ झाली आहे. तर तैवान वेटेड (०.९१%), जकार्ता कंपोझिट (०.१५%), हेगंसेंग (०.२३%) बाजारातील निर्देशांकात घसरण झाली. सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.४४%) वगळता इतर दोन एस अँड पी ५०० (०.४९%), नासडाक (०.६५%) बाजारात घसरण झाली. युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.२१%), सीएससी (०.१५%) बाजारात वाढ झाली असून डीएएक्स (०.०८%) बाजारात घसरण झाली.


आज दिवसभरात सोन्याचा दर भारतीय बाजारपेठेत चढाच राहिला आहे. सकाळी सोन्याच्या निर्देशांकात ०.४८% पर्यंत वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४८% घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर स्तरावर सो न्याच्या निर्देशांकात घसरण होत असली तरी भारतात सातत्याने घसरणारा रूपया आजही सोन्याच्या निर्देशांकातील वाढीला कारणीभूत ठरला ज्या कारणाने सोने कमोडिटी म्हणून भारतीय सराफा बाजारात महागले आहे. चांदीतही आज सलग दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. प्रामुख्याने चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने ही दरवाढ सुरु आहे.


कच्च्या तेलाच्या युएस रशिया शीतयुद्धात अमेरिकेने भारताला खेचले. काल ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल नेटवर्किंग साइटवर भारतावर गंभीर आरोप केले होते.ज्यामध्ये त्यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत युक्रेन मधील मृत्यूंना भारत खतपाणी घालत असून ते ल खरेदी करत रशियाला रसद पुरवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला ज्याला नंतर भारत व रशियाने जोरदार प्रतिउत्तर देत ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला. जागतिक तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचे ओपेक राष्ट्रांनी मान्य केल्याने तेलाच्या पुरवठ्यात कुठला विशेष ट्रिगर नव्हता. त्यामुळे जागतिक पातळीवर कच्चे तेल (Crude Oil) एका मर्यादेपर्यंत स्थिर राहिले आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या जागतिक WTI Futures निर्देशांकात १.७३%, Brent Future निर्देशांकात १.५२% वाढ झाली. तज्ञांच्या मते ही वाढ अतिरिक्त सप्लाय झाल्याने पुन्हा पुरवठ्यात तूट होऊ शकते असे तज्ञांनी म्हटल्यानंतर पुन्हा संध्याकाळी कच्चे तेल महागण्याची शक्यता आहे.भारतातही रूपयांव्यतिरिक्त कमोडिटी स्पॉट मागणीत मोठी मागणी वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली.आ हे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ गॉडफ्रे फिलिप्स (९.९२%), सारडा एनर्जी (७.६७%), किर्लोस्कर ऑईल (६.२९%), वारी एनर्जी (५.३१%), आयटीआय (३.४४%), गोदरेज अँग्रोवेट (२.५२%), युनियन बँक (२.३८%), एशियन पेटंस (२.२३%), रेमंड(१.९७%) स्विगी (२.१८%), एचडीएफसी बँक (०.३९%) समभागात झाली.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (६.६२%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (५.६९%), सीसीएल प्रोडक्ट (५.४५%), गोदावरी पॉवर (४.७४%), हिताची एनर्जी (४.३३%), रेमंड लाईफस्टाईल (४.०३%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (४.१३%), अनंत राज (२.९ २%), लरूस (२.४८%), विप्रो (२.४२%), सन फार्मा (२.२६%), अदानी पॉवर (२.०८%), इंडसईंड बँक (१.९३%), अबोट इंडिया (१.९५%), जियो फायनांशियल सर्व्हिसेस (१.८३%), टोरंट फार्मास्युटिकल (१.८१%), बजाज फायनान्स (१.७१%), जिंदाल स्टील (१ .३९%), आयडीबीआय बँक (१.१९%), अदानी गॅस (१.१५%), सिप्ला (०.८७%) समभागात झाली.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'अमेरिकेतून पुन्हा एकदा व्यापार तणाव निर्माण झाला असूनही, देशांतर्गत बाजारपेठ लवचिक राहिली, २४५०० पात ळीच्या प्रमुख आधार पातळीजवळ स्थिर राहिली. औषध क्षेत्राने कमी कामगिरी केली, जी टॅरिफ इशाऱ्यांचा एक उल्लेखनीय परिणाम म्हणून उदयास आली. अपेक्षेप्रमाणे, आरबीआयने तटस्थ भूमिका राखली आणि धोरणात्मक दर अपरिवर्तित (Unchanged) ठे वले, जागतिक अडचणी ओळखून भारताच्या देशांतर्गत लवचिकता, वित्तीय सावधगिरी आणि मजबूत ग्रामीण मागणीवर भर दिला.चांगला मान्सून आणि निरोगी खरीप पेरणीमुळे चलनवाढीचा अंदाज अधिक अनुकूल झाला आहे. वापर,खाजगी गुंतवणूक, सरकार च्या नेतृत्वाखालील भांडवली खर्चात सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने, देशांतर्गत अर्थव्यवस्था दुसऱ्या सहामाहीत चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येते, बाह्य अनिश्चितता असूनही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवते.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' ६ ऑगस्ट रोजी देशांतर्गत शेअर बाजारांनी सलग दुसऱ्या सत्रात त्यांची घसरण सुरू ठेवली, ज्यामध्ये निफ्टी २४६०० पातळीच्या पातळीच्या खाली बंद झाला, जो व्या पक नफा बुकिंग आणि सावध गुंतवणूकदारांच्या भावनांमुळे भारित झाला. दिवसभर निर्देशांक सतत विक्रीच्या दबावाखाली राहिला, ज्यामुळे मंदीचा पक्षपात दिसून आला, कारण आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) एकमताने रेपो दर ५.५ ट क्के राखण्याचा निर्णय घेतला आणि 'तटस्थ' म्हणून त्याची धोरणात्मक भूमिका कायम ठेवली. बंद होताना, सेन्सेक्स १६६.२६ अंकांनी किंवा ०.२१ टक्क्यांनी घसरून ८०५४३.९९ पातळीवर आणि निफ्टी ७५.३५ अंकांनी किंवा ०.३१ टक्क्यांनी घसरून २४५७४.२० पातळीवर बंद झाला. ०.६ टक्के वाढीसह चांगली कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात बंद झाले, ज्याचे नेतृत्व आयटी, मीडिया, रिअल्टी, फार्मा आणि एफएमसीजीमध्ये तीव्र घसरण झाली, जी १ - २ टक्क्यांच्या श्रेणीत घसरली, जी क्षेत्रीय रोटेशन आणि जोखीम-बंद भावना दर्शवते. विक्रीचा फटका व्यापक बाजारपेठांना बसला, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक दोन्ही सुमारे १ टक्क्यांनी घसरले, जे व्यापक स्पेक्ट्रममध्ये नफा बुकिंग दर्शवते.'


आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'निर्देशांकाने दैनिक चार्टवर सलग दुसऱ्यांदा मंदीचा अनुभव घेतला, ज्यामध्ये कमी उच्चांक आणि कमीांक यांचा समावेश आहे, जो सुधारात्मक पूर्वाग्रहासह चालू एकत्रीकरण टप्प्याची सुरूवात दर्शवितो, जरी स्टॉक-विशिष्ट क्रियाकलाप प्रमुख राहिले असले तरी. निर्देशांकासाठी मजबूत आधार २४५००-२४४०० झोनमध्ये दिसून येतो, जो अनेक तांत्रिक निर्देशकांशी जुळतो - ज्यामध्ये मागील स्विंग लो, १००-दिवसांचा घातांकीय मूव्हिंग अँव्हरेज (Exponential Moving Average EMA) आणि अलिकडच्या अपट्रेंडमधील प्रमुख रिट्रेसमेंट पातळी समाविष्ट आहे. संरचनात्मक दृष्टिकोनातून (Structural Perspective) निफ्टी २४४००-२५००० बँडमध्ये रेंज-बाउंड राहण्याची शक्यता आहे. २४४००-सपोर्ट लेव्हलच्या खाली निर्णायक ब्रेक डाउन येत्या सत्रांमध्ये २४२०० अंकांकडे आणखी घसरण होण्याचा मार्ग मोकळा करू शकतो.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' बँक निफ्टीने एक लहान तेजीची मेणबत्ती तयार केली, जी मागील सत्राच्या किंमत श्रेणीत राहिली, जी स्टॉक-विशिष्ट हालचालींदरम्यान चालू एकत्रीकरण दर्शवते. निर्देशां क ५५२०० आणि ५४९०० दरम्यान एक महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राच्या जवळ आहे - एक क्षेत्र जे मागील वरच्या हालचालीपासून १००-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (EMA) आणि प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी संरेखित करते, ज्यामुळे ते एक महत्त्वपू र्ण मागणी क्षेत्र बनते. वरच्या बाजूस ५६३००-५६५०० श्रेणीमध्ये प्रतिकार दिसून येतो, जो अलीकडील ब्रेकडाउन झोनच्या खालच्या सीमेशी जुळतो. या पातळीपेक्षा सतत पुढे जाणे हे मंदीच्या गतीच्या कमकुवत होण्याचे किंवा सध्याच्या डाउनट्रेंडमध्ये संभाव्य विरा माचे प्रारंभिक संकेत असेल. एकंदरीत, निर्देशांक नजीकच्या काळात ५४९०० ते ५६४०० पातळीच्या परिभाषित श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे, या श्रेणीतून निर्णायक ब्रेकआउट झाल्यानंतरच स्पष्ट दिशात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे.'


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी घसरून १००८०० पातळीवर आल्याने सोन्याचे भाव कमकुवत झाले. कॉमेक्स गोल्डने ३३६० डॉलर्सच्या खाली कमकुवत संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांत डॉलर निर्देशांकात सकारात्मक तेजी दिसून आली आहे. सोन्याचा भाव तांत्रिकदृष्ट्या १०१००० आणि ३४०० डॉलर्सच्या जवळ गेला आहे. रुपयाची कमकुवतता ही देशांतर्गत बाजा रात सोन्याच्या किमतीला बळकटी देते. सोन्याची श्रेणी ९८५००-१०२००० पातळी दरम्यान दिसू शकते.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' रुपया ८७.७५ पातळीच्या जवळपास व्यवहार करत होता कारण सहभागी आरबीआय धोरणाला एक तटस्थ घटना म्हणून पाहतात परंतु ट्रम्पच्या टॅरिफवर लक्ष केंद्रित केले आहे कारण ट्रम्प यांनी भारतावर जास्त टॅरिफ लादण्याचे संकेत दिले आहेत ज्यामुळे भावनांवर परिणाम होऊ शकतो. रुपयाची श्रेणी ८७.४५-८८.२५ मध्ये दिसू शकते.'


यामुळे आजही बाजारात अस्वस्थता कायम होती. उद्याच्या सत्रात ही घसरण कायम राहते का पीएसयु बँकेतील तेजी उद्या बाजाराला सावरते हे पाहणे बाजारात महत्वाचे ठरेल. फार्मा, रिअल्टी, आयटी, टेलिकॉम, बँक या क्षेत्रीय निर्देशांकात लक्ष करणे गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा