Wednesday, August 6, 2025

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदी चीनच्या दौऱ्यावर! काय होणार चर्चा?

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदी चीनच्या दौऱ्यावर! काय होणार चर्चा?

एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीनला भेट देणार असल्याची बातमी समोर येत आहे. पंतप्रधानांचा जपान दौऱ्याच्या उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे असणार आहे,  तर चीनमध्ये ते शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


येत्या ३० ऑगस्ट रोजी मोदी जपानला रवाना होतील, जिथे ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर, पंतप्रधान मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील.



६ वर्षानंतर मोदींचा पहिलाच चीन दौरा


२०१९ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असेल. एससीओ बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद, व्यापार सहकार्य आणि बहुपक्षीय सहकार्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.  पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ब्रिक्स देशांना लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की ब्रिक्स देश डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदींचा हा दौरा धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे.



दहशतवादाबाबत भारताचे कठोर धोरण


जून महिन्याच्या सुरुवातीला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या किंगदाओ शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, जिथे त्यांनी एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. दहशतवादाच्या मुद्द्यावरील मतभेदांमुळे, शांघाय सहकार्य संघटनेने (SCO) संयुक्त निवेदन जारी न करण्याचा निर्णय घेतला. SCO मध्ये चीन-पाकिस्तानच्या कारवाया सूत्रांच्या माहितीनुसार, SCO चे अध्यक्ष असलेले चीन आणि त्याचा जुना मित्र पाकिस्तान दहशतवादापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होते. SCO ने तयार केलेल्या दस्तऐवजात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखही नव्हता. उलट, दस्तऐवजात बलुचिस्तानचा उल्लेख करण्यात आला होता, जो पाकिस्तानी प्रांतात अशांतता पसरवल्याचा भारतावर अप्रत्यक्षपणे आरोप करण्याचा प्रयत्न होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा