
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्तव्य भवन ३ चे उद्घाटन
नवी दिल्ली : आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्तव्य पथ येथील कर्तव्य भवन ३ चे उदघाटन करण्यात आले. मात्र कर्तव्य भवन ३ मध्ये नक्की काय काम चालणार? याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तर ही इमारत कोणत्या उद्देशाने उभारण्यात आली, आणि यामध्ये काय कामकाज चालणार? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
कर्तव्य भवन-३ हे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत पहिली कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट इमारत आहे. यामध्ये गृह, परराष्ट्र व्यवहार, ग्रामीण विकास, एमएसएमई, डीओपीटी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालये/विभाग आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांची कार्यालये असतील. कर्तव्य भवन-३ च्या उद्घाटनानंतर, त्याबद्दलची अधिक माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आले आहेत. तसेच या पत्राकतील निवेदनानुसार, पंतप्रधान सायंकाळी ६:३० वाजता कार्तव्य पथावरील सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.
#WATCH | Prime Minister Narendra Modi inaugurates Kartavya Bhavan at Kartavya Path in Delhi. Kartavya Bhavan has been designed to foster efficiency, innovation, and collaboration by bringing together various Ministries and Departments currently scattered across Delhi. It will… pic.twitter.com/xT7NYyFfy7
— ANI (@ANI) August 6, 2025
कर्तव्य भवन-०३ का बांधण्यात आले?
कर्तव्य भवन-३ हे सेंट्रल व्हिस्टाच्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि चपळ प्रशासन सक्षम करणे हे उद्दिष्ट असलेल्या अनेक आगामी कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट इमारतींपैकी ही पहिली इमारत आहे, असे पीएमओने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याद्वारे प्रशासन आधुनिक पायाभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे सक्षम करतील. या इमारतीमध्ये गृह, परराष्ट्र, ग्रामीण विकास, एमएसएमई, डीओपीटी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख मंत्रालयांचे आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागारांचे कार्यालय आहे. थोडक्यात काय तर एकाच छताखाली सर्व शासकीय आणि पायाभूत सुविधाचे केंद्र येथे एकत्र आणली गेली आहेत.
कर्तव्य भवनबद्दल सर्व काही
कर्तव्य भवन-०३ ची रचना दिल्लीत सध्या विखुरलेल्या विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नावीन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. हे एक कार्यालयीन संकुल आहे जे दोन तळघरांमध्ये आणि सात मजल्याचे असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे १.५ लाख चौरस मीटरवर पसरलेले आहे.
#WATCH || After inaugurating #KartavyaBhavan at Kartavya Path in Delhi, PM @narendramodi planted a tree on the premises of the building. @PMOIndia | @MIB_India | #kartavyapath pic.twitter.com/brG8Cu0T7a
— All India Radio News (@airnewsalerts) August 6, 2025
पीएमओच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कर्तव्य भवन ३ ची इमारत आयटी-सुसज्ज आणि सुरक्षित कार्यक्षेत्रे, ओळखपत्र आधारित प्रवेश, इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि केंद्रीकृत कमांड सिस्टमसह आधुनिक प्रशासन पायाभूत सुविधांचे आदर्श प्रतीक ठरणार आहे. ही इमारत ३० टक्के कमी वीज वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
इमारत थंड ठेवण्यासाठी आणि बाहेरील आवाज कमी करण्यासाठी त्यात विशेष काचेच्या खिडक्या असून. ऊर्जा बचत करणारे एलईडी दिवे, गरज नसताना दिवे बंद करणारे सेन्सर, वीज वाचवणाऱ्या स्मार्ट लिफ्ट आणि वीज वापराचे व्यवस्थापन करण्यासाठी एक प्रगत प्रणाली हे सर्व ऊर्जा वाचविण्यास मदत करतील. तसेच उर्जेसाठी सौर ऊर्जेचा अधिक वापर केला जाणार आहे. त्यासाठी कर्तव्य भवन-०३ च्या छतावर सौर पॅनेल दरवर्षी ५.३४ लाख युनिटपेक्षा जास्त वीज निर्माण करतील. सौर वॉटर हीटर दैनंदिन गरम पाण्याच्या गरजेच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त गरजा पूर्ण करतात. पीएमओच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन देखील प्रदान केले गेले आहेत.
कर्तव्य भवन-१ आणि कर्तव्य भवन-२ चे बांधकाम पूर्ण होणार
नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या मते, कर्तव्य भवन-१ आणि कर्तव्य भवन-२ चे बांधकाम पुढील महिन्यात पूर्ण होईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत प्रस्तावित इतर सात इमारती एप्रिल २०२७ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.