
सध्या फार्मा टेरिफ 'जैसे थे' असले तरी ते टप्याटप्याने वाढणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे ते आगामी वर्षात १०० टक्के मग २५०% इतक्या प्रमाणात वाढणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे इतरही क्षेत्रात २५% टेरिफ वाढल्याने त्याचा परिणाम एक त्रित परिणाम फार्मा शेअर्समध्ये झाला. अरबिंदो फार्मा, डॉ रेड्डीज यांसारख्या कंपन्यांचा अर्ध्याहून अधिक महसूल युएस बाजारातून येतो. भारतातील फार्मा कंपन्याचे युएस मोठा आयातदार आहे. त्यामुळे या शेअर्सच्या गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण काय म आहे. दुसरीकडे दरकपात रोखली गेल्यानं रिअल्टी शेअर्समध्ये दबाव वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेल ऑफ वाढले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एका अहवालानुसार, टेक्सटाईल क्षेत्रावरही दबाव निर्माण झाला आहे. चीन व व बांगलादेश यांच्याक डून मिळणाऱ्या महसूलात घट होण्याची शक्यता असल्याने टेक्सटाइल समभागातही गेल्या आठवड्यात दबाव होता जो आगामी काळात कायम राहू शकतो.
शुक्रवारी भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स कोसळले. निफ्टी फार्मा इंडेक्स एकाच दिवसात ३ टक्क्यांहून अधिक घसरला. अलिकडच्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. ट्रिगर? अमेरिकेकडून दुहेरी धक्का: औषधांसह भारतीय उत्पादनांवर २५% कर आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक औषध उत्पादकांना किंमती कमी करण्याची आणि भविष्यातील औषधांच्या लाँचच्या किमती मर्यादित करण्याची मागणी केली होती.