ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली. कोतवालवाडी, आनंदवाडी हे तिथले पाडे लक्षात राहिले ते तिथल्या छोट्या छोट्या मराठी शाळांमुळे! हा सगळा आदिवासी पट्टा, कर्जतमधील कोंदिवडे नि नेरळमधील जुम्मा पट्टीची आश्रम शाळा हे पुढे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय झाले. याचे कारण म्हणजे तेथील निवासी शिबिरे. छोट्या छोट्या उपक्रमांतून या भागातील शाळांशी नाते जोडले गेले होतेच, पण साधारणपणे १९९५ - ९६ पासून सलग आठ दिवसांची निवासी शिबिरे येथील माणगाववाडी आश्रम शाळेत होऊ लागली. शाळेत मुलांची संख्या तेव्हा नुकतीच कुठे वाढू लागली होती. शौचालयांची देखील सोय नव्हती पण तेथील शिक्षकांमध्ये मुलांना सतत ध्यास घेऊन घडवण्याची आस होती.

गेल्या काही वर्षांत शाळेने चांगलीच प्रगती केली. दादासाहेब गायकवाड, मुख्याध्यापक साळवी आणि इकारे सर शिक्षक चमूसोबत सतत कार्यरत आहेत.

सभागृह, मुलांच्या राहण्याची सोय, मुलांच्या आहाराची उत्तम व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे शाळेत उत्तम बदल घडले आहेत. आज या शाळेत जवळपास पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संगीत, नृत्य, विविध खेळांतील नैपुण्य अशा सर्व अंगांनी मुले घडत आहेत. मुलांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अतिशय तुटपुंज्या आर्थिक बळासह ही मराठी शाळा मुलांना परिस्थितीशी टक्कर घ्यायला शिकवते आहे.

गेली २५ वर्षे मराठी शाळांची वाताहात मनाला अस्वस्थ करते आहे. अनेक मराठी शाळा अखेरचा श्वास मोजत आहेत. माहीम येथील महानगर पालिकेची न्यू माहीम मराठी शाळा ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात इमारत धोकादायक आहे की ती तशी असल्याचा बनाव करण्यात आला आहे? हा प्रश्न शाळेचे माजी विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. भांडुप हा तर अस्सल मराठमोळ्या वस्तीचा भाग. या भागातील मराठी
शाळांची पडझड मन अस्वस्थ करणारी आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील वैभववाडीची जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रुती घोडके हिने आयआयटीची मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवून घवघवीत यश संपादन केले. ग्रामीण भागातील मुले जिद्दीने काय करू शकतात हे दाखवून दिले. मराठी माध्यमातील शिक्षणावर संशय घेणाऱ्यांना मिळालेले हे चोख उत्तर आहे.
Comments
Add Comment

ऐसी मती जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर १९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले.

घातकी संगत

माेरपीस : पूजा काळे गुणदोषाच्या आधारे माणसाच्या स्वभावाचे विश्लेषण करता येते. अमूक एकाबद्दल बोलताना, त्या

पहिली दलित महिला उद्योजिका

दी लेडी बॉस :अर्चना सोंडे आज स्त्रियांचं जीवन कितीतरी पटीनं सुसह्य झालं आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे स्त्री

भारताची भीती दाखवून चीनचा शस्त्र पुरवठा

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरनंतर भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनचे

मराठी शाळा : मायमराठीचा कणा!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर मराठी अभ्यासकेंद्राने नेहमीच ठाम भूमिका घेऊन मराठीविषयक प्रश्नांवर आवाज उठवला. या

मॉल मॉली आणि मी

माेरपीस : पूजा काळे मॉली आमच्या एका थोरल्या भाचीची गोड मुलगी. तिचं पाळण्यातलं नाव मलिष्का. लाडात वाढल्याने तिला