Wednesday, August 6, 2025

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न
मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच न्यायालयीन आदेशानुसार महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची रवानगी 'वनतारा'मध्ये करण्यात आली आहे. पण या दोन्ही नागरिकांची आंदोलनं सुरू आहेत. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला 'वनतारा'मधून परत आणावे अशी नांदिणी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. तर कबुतरखाने सुरू ठेवावे अशी मागणी करत मुंबईत जैन समुदाय आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि न्यायालयात दाद मागणे हाच पर्याय असल्याचे त्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे.



याआधी दादरच्या कबुतरखाना परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद केला होता. आंदोलकांनी ताडपत्री हटवून कबुतखान्यात धान्य टाकले आणि घोषणाबाजी केली. कबुतरखाना सुरू ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात यू टर्न घेतला आहे. चार दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी केली आहे.

कबुतरखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत अशी मनसेची आधीची अधिकृत भूमिका होती. पण मुंबईतले जैन समाजाचे आंदोलन बघून मनसेने यू टर्न घेतला आहे. मनसेने हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात महाराष्ट्र शासनाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >