
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४' ने गौरवण्यात आलं. अभिनय कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान तिला मिळाला. काजोल ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी असून, तिनंही आईच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. पुरस्कार स्विकारल्यानंतर काजोलने मराठीत मनोगत व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी तिनं तिच्या आईची खास साडी नेसली होती.

मोहित सोमण:आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा थोड्याच वेळात आपला वित्तीय पतधोरण समितीचा (MPC) निकाल जाहीर करतील. ४ ते ६ ऑगस्टपर्यंत आज वित्तीय पतधोरण ...
आईच्या साडीतील गौरवाचा क्षण; पुरस्कार स्वीकारताना भावूक झाली काजोल"
राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोल हिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोलने मराठीतून मनोगत व्यक्त करत आपला आनंद आणि कृतज्ञता शब्दांत मांडली. विशेष म्हणजे, त्या दिवशी तिचा वाढदिवसही होता आणि हा सन्मान वाढदिवसाच्या दिवशी मिळाल्याने तिच्या आनंदाला खास छटा लाभली. काजोल म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे आणि याच खास दिवशी हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. इतक्या मोठ्या मंचावर, दिग्गजांच्या उपस्थितीत माझा गौरव होत आहे, हे माझं भाग्य आहे. खरं तर मी निःशब्द झाले आहे." या भावनिक क्षणात काजोलने आपल्या आईबाबतही गौरवाने उल्लेख केला. "आज मी आईची साडी नेसून कार्यक्रमाला आले आहे. हा पुरस्कार याआधी माझ्या आईला मिळाला होता आणि आज तोच सन्मान मला मिळतोय, यापेक्षा मोठा अवॉर्ड माझ्यासाठी दुसरा कोणता असणार?" असं ती म्हणाली. स्वतःच्या आईबरोबर हा गौरवाचा क्षण अनुभवताना काजोल भावूक झाली होती. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं. शेवटी, "मी सर्वांची खूप आभारी आहे, थँक्यू!" अशा शब्दांत काजोलने आपलं भाषण संपवलं.
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सिनेसृष्टीतील दिग्गजांचा गौरव
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ गायक भीमराव पांचाळे यांना मिळालेला ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना मिळालेला ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर आणि प्रतिभावान अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनाही सन्मानित करण्यात आलं. त्यांचं योगदान मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण मानलं जातं. कार्यक्रमाची शान वाढवताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संपूर्ण सिनेसृष्टीच्या मान्यवर उपस्थितीमुळे वातावरण भारलेलं होतं. या सोहळ्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा दिला, आणि मराठी चित्रपटसृष्टीतील उंचावलेल्या दर्जाची साक्षही दिली.