Wednesday, August 6, 2025

Aceelya कंपनीकडून गुंतवणूकदारांना ४००% लाभांश अधिक मिळणार !

Aceelya कंपनीकडून गुंतवणूकदारांना ४००% लाभांश अधिक मिळणार !

रेकॉर्ड डेट २४ ऑक्टोबरला


मोहित सोमण: आयटी सेवा व व्यवस्थापन सुविधा पुरवणारी एक्सेल्या सोल्यूशन इंडिया लिमिटेड (Accelya Solutions Limited) कंपनीने चक्क ४००% लाभांश आपल्या समभागांवर (Stocks) जाहीर केला. त्यामुळे शेअर्समध्ये ४० रूपयांचा अंतिम लाभांश जाहीर केल्याने आता गुंतवणूकदारांना हा लाभांश मिळेल. कंपनीने १ ऑगस्टला आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. कंपनीने लाभांशांसाठी २४ ऑक्टोबरला रेकॉर्ड तारीख (Record Date) निश्चित केली आहे.


कंपनीने पहिल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला होता ज्यामध्ये कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ८.८५% निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. मागील वर्षाच्या तिमाहीतील ३१.१९ कोटींच्या तुलनेत यावर्षी तिमाहीत ३३.९५ कोटींचा निव्व ळ नफा (Net Profit)  मिळाला होता. कंपनीच्या विक्रीत (Sales) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३.४७% वाढ होत मागील वर्षाच्या तिमाहीतील ५१०.७९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५२८.४९ कोटीवर गेली. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाल्याने नफा ५१.१९ कोटीवर गेला होता. तर करोत्तर नफा (PAT) नव्या उच्चांकावर पोहोचत ४२.६३ कोटींवर गेला.


यापूर्वी कंपनीने,' आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, कंपनीच्या भागधारकांच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीच्या अधीन राहून, प्रति शेअर ४० रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांश दे ण्याची तारीख गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५ आहे असे ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये नमूद केले होते.


यामुळेच २४ ऑक्टोबर या रेकॉर्ड तारीख (Record Date) पूर्वी कंपनीचा शेअर खरेदी केल्यास गुंतवणुकदारांना शेअर्सवरील लाभांश मिळेल. हा लाभांश कंपनीकडून २७ नोव्हेंबरपर्यंत रोल आऊट (मिळू) शकतो. ५ ऑगस्टला कंपनीच्या शेअर्समध्ये ०.९६% नु कसान झाले होते. आज मात्र १२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.७२% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर १३८८.१० रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा