Wednesday, August 6, 2025

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने


नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. आता टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-२ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.


भारत उर्वरित वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. भारत आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. भारत ऑक्टोबर महिन्यात विंडीजविरुद्ध २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर शुभमनसेना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये २ मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आहे. विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे तर दुसरा सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे होणार आहे.


तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबरला कोलकाता आणि दुसरा सामना २२ ते २६ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे पार पडणार आहे.


दरम्यान, शुभमन गिल याच्या नेतृत्वातील पहिली कसोटी मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत राखली.


टीम इंडिया पाचव्या सामन्याआधी या मालिकेत १-२ ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना हा प्रतिष्ठेचा होता. भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान होते. टीम इंडियाने हा सामना जवळपास गमावलाच होता. मात्र टीम इंडियाने ऐन क्षणी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा