जागतिक सोन्याच्या निर्देशांकात आज दिवसभरात घसरण झाली होती. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४८% वाढ झाली. तर मानक (Standard) म्हणून मानल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.४९% घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति डॉलर दर ३३६४.६९ औंसवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) बाजारात सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५१% घसरण झाल्याने सोने दरपातळी १००८२४.०० रुपयांवर पोहोच ली आहे.
सोन्यात नवा उच्चांक! जागतिक बाजारपेठेत स्वस्त पण भारतात का वाढतय सोने?
जागतिक सोन्याच्या निर्देशांकात जागतिक अस्थिरतेतचा सातत्याने फटका बसतोय. त्यामुळे मोठ्या संख्येने दरात चढउतार सुरु आहे. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता नसल्याने तसेच अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी कमकुवत आल्याने सोन्याच्या दरात काल उशीरापासून घसरण सुरू आहे. सोन्याच्या मागणीतही जागतिक स्तरावर घसरण झाली त्यामुळे बाजारात किंमती उतरत आहे. परंतु भारतीय बाजारपेठेत परिस्थिती वेगळी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे कमोडि टी बाजारातील समीकरणे बिघडली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय गुंतवणूकदारांनी घेतला ज्यात प्रत्यक्ष सोने अथवा ईपीएफ (Exchange Traded Fund ETF) यांचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या स्पॉट मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दरवाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने सोन्याच्या दराला भारतात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. काल रूपयांने नवा निचांकी आकडा गाठल्यावर आज रूप या १५ पैशाने वधारला ज्यामुळे ही सोने दरवाढ मर्यादित प्रमाणात राहिली आहे. मात्र गेल्या महिनाभरात वाढलेल्या किंमती पाहिल्यास सोन्यात सर्वाधिक चढ उतार याच सात दिवसात पहायला मिळाली.
सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी घसरून १००८०० पातळीवर आल्याने सोन्याचे भाव कमकुवत झाले. कॉमेक्स गोल्डने ३३६० डॉलर्स च्या खाली कमकुवत संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांत डॉलर निर्देशांकात सकारात्मक तेजी दिसून आली आहे. सोन्याचा भाव तांत्रिकदृष्ट्या १०१००० आणि ३४०० डॉलर्सच्या जवळ गेला आहे. रुपयाची कमकुवतता ही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किम तीला बळकटी देते. सोन्याची श्रेणी ९८५००-१०२००० दरम्यान दिसू शकते.'
चांदीतही सलग दुसऱ्यांदा वाढ कायम !
चांदीच्या दरातही जागतिक मागणीमुळे मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयांने व चांदीच्या प्रति किलो दरात १००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर ११६ रूपये, प्रति किलो दरपातळी ११६००० रूपये आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सरासरी प्रति १० ग्रॅम दर १२६०, प्रति १०० ग्रॅम दर ११६०० तर प्रति किलो दर ११६००० रूपयांवर स्थिरावले आहेत. संध्याकाळपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ०.१९% घसर ण झाली असली तरी भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (MCX) मध्ये चांदीच्या निर्देशांकात ०.४४% घसरण झाली आहे. आज दुपारपर्यंत चांदीच्या दरात वाढत्या घरगुती उपभोगासाठी तसेच वाढलेल्या औद्योगिक मागणीमुळे झाली आहे.