
हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३० वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण बोगी जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाले असून, आज (मंगळवार) त्यांची ...
स्थानकावर मागील काही महिन्यांपासून तीन बोगी उभ्या होत्या. त्यापैकी एका बोगीतून अचानक आगीचे लोट आणि धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढत गेल्याने नगरपालिका अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, एका बंबातील पाणी संपल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने दुसऱ्या बंबाची मदत घेण्यात आली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर शेवटी ही आग नियंत्रणात आली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू केली आहे.