मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद सिराजने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. सिराजने या मालिकेत १०००हून अधिक षटकेही टाकली. तसेच शेवटच्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयासाठी अक्षऱश: जीव ओतला. सिराजच्या या गोलंदाजीने सर्व देशवासियांची मने जिंकली. तर तेलंगणा पोलिसांनी आपल्या डीएसपीसाठी शानदार पोस्ट शेअर केली आहे.
पाहा काय म्हटलंय तेलंगणा पोलीस विभागाने...
मोहम्मद सिराजने मिळवल्या २३ विकेट
मोहम्मद सिराजने या मालिकेत१,११३ षटके टाकली. सिराज या संपूर्ण मालिकेत चमकला. पाचव्या कसोटी सामन्यात सिराजने ९ विकेट मिळवल्या. याच्या जोरावर टीम इंडियाला शेवटच्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवता आला. तसेच ही मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली. सिराजने या संपूर्ण मालिकेत एकूण २३ विकेट मिळवल्या. यासोबतच या या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत सर्व दिग्गजांनी मोहम्मद सिराजचे कौतुक केले. सिराजने ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी नवा किर्तीमान रेकॉर्ड केला. या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी ४ विकेट हव्या होत्या. त्यातील ३ विकेट सिराजने काढल्या. या कठीण सामन्यात इंग्लंडला पराभूत केले.