माय-लेक बळी!

  21

मनुष्य हा मुळात हिंस्र प्राणी आहे आणि त्याची हिंसा ही आपल्यापेक्षा कमजोर विरोधात प्रखर होते. त्याचे हिंस्र दात महिलांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आतुर असतात, हे आपण बरेचदा पाहतो. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यात बालकांवरील अत्याचाराच्या झालेल्या गुन्ह्यांत १० हजार ६६२ इतक्या आकड्यांची नोद आहे. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण ३ हजार ५०६ इतके आहे. ही आकडेवारी भयावह आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सजग नागरिकांची चिंता वाढली आहे. महिलांवरील अत्याचाराचे स्वरूप सामान्यतः खून, बलात्कार आणि विनयभंग तसेच घरगुती हिंसाचार या स्वरूपाचे असते. महिलांवरील अत्याचार करणारे कोण असतात तर सामान्यपणे नातेवाईक मंडळी काका, मामा आणि क्वचित आजोबा किंवा कदाचित वडीलही असतात. अशी कित्येक उदाहरणे आहेत की ज्यांच्यावर त्यांच्या वडिलांनी लहानपणीच लैंगिक अत्याचार केले आहेत. मूलतः जी बालके आपल्या नातेवाइकांकडे विश्वासाने पाहतात त्या विश्वासाचा अगोदर खून होतो आणि नंतर तिचे शारीरिक दमन केले जाते. कोणत्याही वयातील स्त्रीवर अत्याचार होणे हे धक्कादायकच असते. पण लहानपणी अत्याचार झालेे, तर अशी मुले आयुष्यातून उठतात. अत्याचार झाल्यावर या महिलांना आणि मुलांना कुणीही विचारत नाही. त्यांची रवानगी तुरुंगात होते. कित्येक बालके तुरुंगात जन्माला आलेली आहेत आणि त्यांच्या आया तुरुंगात अन्यथा महिलाश्रमात राहतात. पुरुषप्रधान मानसिकतेचे बळी ठरलेल्या महिला आणि बालकांना नंतरच्या जगात कुणीही विचारत नाही. रस्त्यावर ही मुले वाढतात आणि आया वेश्यावस्तीत राहतात. हे समाजाचे आजचे चित्र असले तरीही ते वास्तव आहे. आपण त्यांच्या जगात असे अनुभव घेत नाही म्हणून हे वर्णन अवास्तव वाटेल पण तसे नाही. ही आकडेवारी जी वर दिली आहे ती हेच सांगते. अत्याचार करणारे आपल्याच समाजातील असतात आणि पुरुष मात्र नामानिराळे राहतात आणि समाजातील इतर सुख घेत राहतात.


२०१२ मध्ये भारतातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण ४ टक्के होते ते सातत्याने वाढतच आहे. नॅशनल क्राईम ब्युरो दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध करत असते आणि त्यानुसार भारतात सरासरी तीन मिनिटाला एक महिला बळी पडते. वधूला हुंडा आणला नाही म्हणून तिचा छळ केला जातो हे प्रकार तर सर्रास केले जायचे. आता हे प्रमाण कमी झाले आहे. पण ते थांबलेले नाही. बालकांवरील अत्याचाराच्या प्रकारांतही वाढ चिंताजनक आहे आणि त्यांचे स्वरूप सामान्यतः ठरलेले असते. सोडोमी नावाचा प्रकार असतो, त्यानुसार बालके अत्याचारास बळी पडतात आणि त्याविरोधात दाद मागण्यासाठी परिवार असहाय्य असतो आणि गरीब असतो. सहसा असे अत्याचार करणारे धनदांडगे असतात. त्यामुळे हे प्रकार खपून जातात. पण अत्याचार झालेले बालक कायम त्या अत्याचाराच्या जखमा झेलत असते. यावर उपाय आहे आणि शाळांमधून मुलांना बॅड टच आणि गुड टच हे शिकवले, तर सहसा असे प्रकार होत नाहीत. अल्पवयीन मुलांवर आणि मुलींवर तसेच नकळत्या वयातही मुलींवर अत्याचार करणारे नराधम आहेत आणि त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे वेळोवेळी उघड होतात. पण सहसा आपला समाज या प्रकारांकडे फार लक्ष देत नाही आणि त्याचाच फायदा हे गुन्हेगार घेतात. आता महिला जास्त मुक्त झाल्या आहेत आणि त्या स्वतःवरील बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल अधिक मोकळेपणे बोलू लागल्या. पण बालकांचे तर तसे नाही. अर्थात स्त्रिया मोकळ्या झाल्या म्हणून त्यांच्यावरील अत्याचार थांबले आहेत असे नाही.


महिलांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती पुरुषप्रधान मालिकेतून बळावली आहे हे निश्चित. महिलांवर अत्याचार नुसते शरीरानेच केले पाहिजेत असे नाही, तर कित्येकदा आविर्भावातून त्यांच्यावर अत्याचार केला जातो. भारतात लैंगिक असमानता स्वीकारली गेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार केले जातात ही वस्तुस्थिती आहे. महिलांची प्रगती ही पुरुषांच्या अत्याचाराचे प्रमुख कारण आहे, तर बालकांवरील अत्याचार हे त्यांच्या असहाय्यत्वतेच कारण आहे. कारण बालक पोलिसांकडे अथवा कुठे जाणार हा प्रश्न असतो. त्यामुळे महिला अत्याचार आणि बालके अत्याचारापासून कधीच सुरक्षित राहणार नाहीत. महाराष्ट्रात काही जमाती अशा आहेत की, योनि शुचिता हे स्त्री कुमारी आहे की नाही याचे अंतिम लक्षण मानले जाते. तसे आढळले नाही तर ती स्त्री पवित्र नाही आणि त्यामुळे विवाहास योग्य नाही अशी धारणा आहे. यामुळे कित्येक स्त्रियांना अत्याचार सोसावे लागले आहेत. पूर्वी तर स्त्रियांचा गुलामाप्रमाणे व्यापार चालायचा आणि त्यात थायलंड ते इथिओपियासारखे देशही सहभागी होते. पण ते दूरचे उदाहरण झाले. महाराष्ट्रात बालके आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली हे प्रमाण चिंताजनक आहे. समाजधुरिणांनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपले कायदेही पुरुषांना प्राधान्य देतात. त्यात आता बरीच सुधारणा झाली आहे आणि बहुतेक कायद्यात स्त्रियांच्या बाजूने निकाल दिले जाऊ लागले आहेत. पण अजून खूप प्रवास बाकी आहे. २००२ मध्ये प्रत्येकी ५ स्त्रियांपैकी एका स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही आकडेवारी भयावह आहे. कारण शेवटी जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो, जो आईचा अपमान करतो तो ईश्वराचा अपमान करतो. त्याचा विनाश निश्चित आहे.

Comments
Add Comment

मोअर इक्वल्सना धडा

जॉर्ज ऑरवेल या लेखकाची अॅनिमल फार्म प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यात डुकरांना शक्तीशाली होताना पाहून एक वाक्य

बोटावर निभावलं!

‘जीवावर बेतलेलं अखेर बोटावर निभावलं' म्हणून राज्याचे नूतन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी रात्री

अजेंडा फसला!

‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही', अशी टिप्पणी करत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास

‘लाडक्यां’चा घोटाळा

राज्यात लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या एनकेन कारणाने वादात आहे. ही सरकारी योजना केवळ

माँ तुझे सलाम...

पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण

‘दिव्या’ विजेती

भारतात उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर सारे चित्र पालटले आणि महिलांची सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या