Monday, August 25, 2025

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प) निर्यातीला बसणार आहे. या नव्या धोरणामुळे भारतातून अमेरिकेला होणारी आमरसाची निर्यात घटण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

भारतातून दरवर्षी १५ हजार मेट्रिक टन आमरसाची निर्यात होते. त्यापैकी २०० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत जातो. या निर्यातीमध्ये कोकणातील हापूस आमरसचा मोठा वाटा आहे. कोकणातून दरवर्षी ५० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत निर्यात होत असतो. अमेरिकेच्या या टेरिफमुळे ५० कोटींच्या निर्यातीवर १२.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर लागणार आहे.

अमेरिकेतली ग्राहकांनाही आमरससाठी २५ टक्के जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे आमरसच्या मागणीत घट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या नवीन नियमावलीमुळे आंबा प्रक्रिया व्यावसायिकांना झळ बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लावला आहे. त्यामुळे कोकणातून निर्यात होणाऱ्या आगरसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातून ५० कोटींचा आमरस निर्यात होतो. या ५० कोटीच्या निर्यातीवर लागणाऱ्या अतिरिक्त कराची झळ प्रक्रिया व्यावसायिकांना बसणार आहे. अमेरिकेतील आमरस घेणाऱ्या ग्राहकांनाही जास्त किंमत मोजावी लागणार आहे. परिणामी, विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये लक्ष देत पूर्वीप्रमाणे शून्य टक्के टॅरिफ कर करावा, यासाठी प्रयत्न करावेत. आनंद देसाई, आंवा प्रक्रिया उद्योजक व निर्यातदार, रत्नागिरी

Comments
Add Comment