
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गंभीर यांनी 'X' वर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही काही सामने जिंकू, काही हरू... पण आम्ही कधीच हार मानणार नाही!" त्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना "वेल डन बॉईज!" असे म्हटले आहे.
We’ll win some, we’ll lose some…. but we’ll NEVER surrender! 🇮🇳 Well done boys! pic.twitter.com/lZ5pk4C4A5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 4, 2025
गंभीर यांची ही प्रतिक्रिया त्यांचा संघावर असलेला विश्वास दर्शवते. या विजयाने त्यांच्या रणनीतीचीही पुष्टी झाली आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ओव्हल कसोटीतील विजयाने त्यांच्या या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.
३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकवेळ ३ बाद ३०१ इतकी होती. त्यावेळेस हॅरी ब्रूक आणि ज्यो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. असे वाटत होते की सामना त्यांच्या ताब्यात आहे. मात्र यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच आणि प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट मिळवल्या.