
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२२२ ,२२ कॅरेटसाठी ९३७०, १८ कॅरेटसाठी ७७७४५ रुपयांवर स्थिरावले आहेत. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याने रूपयांचे मोठे अवमूल्यन झाले ज्याचा आणखी फटका सोन्याच्या दरात बसला. जागतिक टेरिफ वाटाघाटीचा फटका आज सकाळपासूनच सोन्यात कायम असल्याने सोन्याला सपोर्ट लेवल आज दिवसभरात मिळू शकली नाही. सकाळीही सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली होती. संध्याकाळपर्यंत सो न्याच्या जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात ५.२३ वाजेपर्यंत ०.५९% घसरण झाली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.६२% घसरण झाल्याने सोन्याचे जागतिक मूल्यांकन प्रति युएस डॉलर ३३५२.८१ औंसवर गेले आहे. भारतीय बाजार पेठेतील कमोडिटी एक्सचेंज असलेल्या एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत ०.६०% घसरण झाली असल्याने सोने दर पातळी १००५९५.०० रूपयांवर गेली.
आज जागतिक सोने स्वस्त होऊनही भारतीय सोन्याच्या दरात वाढ !
जागतिक सोन्याच्या निर्देशांकात घसरण होऊनही भारतीय सोने महाग झाले आहे. ज्याचे मुख्य कारण घसरणारा रूपया असून याशिवाय उद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपला वित्तीय पतधोरण समितीचा निकाल जाहीर करेल. त्यामुळे पुढील हालचाल हो ण्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात आपली गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी सोन्याचा आधार घेतलेला असू शकतो ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या अतिरिक्त मागणीमुळे ही वाढ झाली.
बाजारातील आगामी सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' कॉमेक्स सोन्याचा भाव $३३७०-$३३७५ झोनजवळ प्रतिकार झाल्यामुळे सोन्याचा भाव ४०० रुपयांनी घसरून १००७८० पातळीवर व्यवहार झाला, तर ८७.८० च्या आसपास असलेल्या रुपयाने देशांतर्गत किमतींवर थोडासा दबाव आणला. बाजारातील सहभागी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आकड्यांवर लक्ष ठेवून आहेत, परंतु प्राथमिक लक्ष व्यापार शुल्क विकासावर आहे. अ मेरिका त्यांच्या बाजूने शुल्क पुनर्संचयित करण्याचा विचार करत आहे. अल्पकालीन घसरण असूनही, व्यापार शुल्क अनिश्चितता आणि डॉलरच्या कमकुवतपणाच्या व्यापक परिणामात सोन्याच्या किमतीत वाढ होत राहते, ज्यामुळे एकूण ट्रेंडला आधार मिळतो.सो न्याचा व्यापार ९९०००-१०१५० रूपयांच्या अस्थिर श्रेणीत होण्याची अपेक्षा आहे.'
सोन्यासह चांदीतही तुफानी -
सोन्यासह चांदीच्या दरातही आज 'तुफानी' वाढ झाली आहे. चांदीने चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दरपातळीत मोठी आघाडी घेतली आहे. प्रामुख्याने टेरिफमधील अनिश्चितेमुळे धातूंच्या आयात निर्यातीत त्याचा संभाव्य परिणाम होऊ शकतो. याशिवाय त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम चांदीच्या औद्योगिक क्षेत्रातील वापरात अपेक्षित असल्याने चांदीत अस्थिरता वाढली. पर्यायाने गुंतवणूकदारांनी चांदीच्या पोजिशन घेत आपली गुंतवणूक वाढवल्यामुळे आज चांदीत वाढ झाली. आज भारतीय एमसीएक्सवर चांदीचे स प्टेंबर महिन्यातील कॉन्ट्रॅक्ट (Contract) २६ रूपयांनी वाढत ११२२६२ रूपयांवर गेले ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी आपल्या बेट मध्ये वाढ केली.
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २ रुपयांनी व प्रति किलो दरात २००० रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम दर ११५ व प्रति किलो दर ११५००० रूपयांवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकातही वा ढ झाली. संध्याकाळपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ०.४३% वाढ झाली. तर एमसीएक्स बाजारात चांदीच्या निर्देशांकात ०.१०% वाढ झाली असून दरपातळी ११२३४६.०० रूपयावर गेली. भारतातील मुंबईसह प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति किलो दर ११५००० आहेत.