Tuesday, August 5, 2025

गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर जोरदार उसळला मात्र त्रिवेणी टर्बाइन शेअर जोरदार कोसळला 'या' कारणामुळे

गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर जोरदार उसळला मात्र त्रिवेणी टर्बाइन शेअर जोरदार कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: बाजारात दोन महत्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत त्या म्हणजे गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Philips India Limited) कंपनीचा शेअर्स तुफान उसळला असून त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine) कंपनीचा शेअर मोठ्या अंकाने कोसळला आहे.


गॉडफ्रे फिलिप्स लिमिटेड -


कंपनीच्या शेअर्समध्ये सकाळी सत्र सुरू झाल्यावरच मोठी वाढ झाली आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यावरच बीएसईत कंपनीचा समभाग (शेअर) ९.९% उसळत ९८९१ या नव्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. सकाळी ११.४७ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीथोडकी नाही थेट १०% उसळी घेतली आहे. कंपनीच्या समभागात प्रति शेअर ९९८ म्हणजेज जवळपास १००० रूपयांनी वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला‌.


का वाढतोय शेअर -


कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. ज्यामध्ये पहिल्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५६% एकत्रित निव्वळ नफा मिळाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील २२८.५५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ३५६.२८ कोटींचा नि व्वळ(Net Profit) नफा मिळाला. याशिवाय कंपनीने बोनस शेअर घोषित केल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे.


रेग्युलेटरी फायलिंगमधील माहितीप्रमाणे, कंपनीने निव्वळ नफ्यात ५६% वाढ केली. तर कंपनीच्या एकत्रित कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Total Revenue from Operations) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३६.५४% वाढ झाली ज्यामध्ये या तिमा ही कंपनीला महसूल १४७६.२ कोटींवर मिळाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit Before Tax PBT) मध्ये ३३६.०२ कोटींवरुन वाढत ४४७.९९ कोटींवर गेले. सिगारेट, तंबाखू व संबंधित उत्पादनांतून मिळणारा महसू ल (Revenue) ३३.०९% वाढला आहे. याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळाने काल बैठक घेतली ज्यात २:१ या गुणोत्तरात बोनस शेअर जाहीर करण्यात आले ज्या कारणाने शेअर उसळलाय.


२) त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड-  त्रिवेणीचा शेअर आज मोठ्या संख्येने बाजारात कोसळला आहे. ज्यामध्ये सकाळी सत्र सुरूवात झाल्यावरच कंपनीच्या शेअर्समध्ये ९% घसरण झाली होती. सकाळी ११.५७ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ७.१७% घसरण झाली आहे. कारण कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यावरच गुंतवणूकदारांनी कंपनीला आज बाजारात नकारात्मक प्रतिसाद दिला. तिमाहीतील माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिन मध्ये -८१% घसरण झाली असून निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर -२०% घसरण झाली. ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) २३% घसरत ७३.६ कोटींवर पोहोचला आहे. तर ईबीटा मार्जिन ८१ बेसिस पूर्णांकाने घसरले आहे.


कंपनीच्या निव्वळ नफ्यातही २०% घसरण झाली. ज्यामध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील ८०.४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६४.४ कोटींवर नफा घसरला. कंपनीच्या निकालावर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ध्रुव साहनी म्हणाले होते की तिमाही ची कामगिरी आमच्या अपेक्षांपेक्षा कमी राहिली आणि ती अधिक आव्हानात्मक ठरली. तथापि त्यांनी पुढे म्हटले की कामकाज पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत आणि कंपनी दीर्घकालीन वाढीचा मार्ग कायम ठेवण्यासाठी मार्गावर आहे अ सा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा