
जाणून घेऊयात या दोन्ही आयपीओ विषयी -
१) Knowledge Realty Trust REIT -४८०० कोटींचा आयपीओ आज ५ ऑगस्टपासून ते ७ ऑगस्टपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला आहे. या आयपीओला पहिल्या दिवशी के वळ एकूण ०.६२% सबस्क्रिप्शन मिळाले.ज्यामध्ये सर्वाधिक वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non Institutional Investors NII) ०.९३%, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Buyers QIB) यांच्याकडून कंपनीला ०.३५% सबस्क्रिप्शन मिळाले. किरकोळ गुंतवणूकदारांकडून कुठलेही सबस्क्रिप्शन अद्याप आयपीओला मिळाले नाही.
४८ कोटी शेअर्सचा हा फ्रेश इशू (Fresh Issue) असणार आहे. बीएसई व एनएसईत १८ ऑगस्टला कंपनीचा शेअर सूचीबद्ध (Listed) होईल असे कंपनीने म्हटले होते. १२ ऑगस्टला आयपीओ ची निश्चिती होणार असून या दिवशी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येईल. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना कमीत कमी १५० शेअर्सची बोली (Bidding) ला वावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) आयपीओसाठी कमीत कमी १४२५० रुपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य असेल.
एकूण आयपीओतील गुंतवणूकीत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Buyers QIB) यांच्यासाठी ७५% वाटा, २५% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Inst itutional Investors NII) उपलब्ध असेल. यापूर्वीच कंपनीने १६२० कोटींची उभारणी अँकर गुंतवणूकदारांकडून केली आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band) ९५ ते १०० रू पये प्रति शेअर निश्चित केला होता. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १६% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३४% नुकसान झाले आ हे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ३३९.६६ कोटींवरून घसरत या तिमाहीत २२२.५२ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मागील वर्षाच्या ति माहीतील २८३०.३६ कोटीवरून वाढत या वर्षीच्या तिमाहीत ३२९३.०३ कोटींवर गेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर थकबाकी चुकवण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
केआरटीआर भारतात उच्च दर्जाचे ऑफिस पोर्टफोलिओ मालकी आणि व्यवस्थापन (Asset Management) क्षेत्रात कार्यरत आहे.मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू येथील त्यांचे प्रमुख स्थान त्यां च्या एकूण उत्पन्नाच्या ९०% पेक्षा जास्त उत्पन्न आणते. ते भारतातील सर्वात पसंतीचे ऑफिस स्पेस पुरवठादार आहे भारतीय आणि जागतिक ग्राहकांना सेवा देते. कंपनीला पहिल्या दिवशी पात्र सं स्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.३५%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.९३% सबस्क्रिप्शन मिळाले.
२) Highway Infrastructure Company Limited - कंपनीचा आयपीओ आजपासून ते ७ ऑगस्टपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. १३० कोटींच्या या आयपीओत १.३९ को टी शेअर फ्रेश इशूतून खरेदीसाठी उपलब्ध असतील तर ऑफर फॉर सेल (OFS) साठी ०.४६ कोटी शेअर उपलब्ध असतील असे कंपनीने म्हटले आहे. ८ ऑगस्टला आयपीओची निश्चिती होणार असून या दिवशी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येईल. १२ ऑगस्टला शेअर बीएसई व एनएसईत सूचीबद्ध (Listed) होईल. आयपीओसाठी ६५ ते ७० रूपये प्र ति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १३७१५ रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य असेल. आयपीओपूर्वीच कंपनीने २३.४० को टींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून मिळवली आहे.
१९९५ मध्ये स्थापन झालेली हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचआयएल) ही एक भारतीय पायाभूत सुविधा विकास आणि व्यवस्थापन कंपनी आहे जी टोलवे संकलन, ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) प्रकल्प आणि रिअल इस्टेट विकासात गुंतलेली आहे. ही कंपनी रस्ते, महामार्ग, पूल आणि निवासी प्रकल्पांच्या बांधकाम आणि देखभालीमध्ये विशेषज्ञ आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी ३०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ३०%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (४०%) वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. कंपनीच्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसूलात १३% घसरण झाली आहे तर करोत्तर नफा (PAT) मात्र ५% वाढला.
मागील वर्षाच्या तिमाहीतील २१.४२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २२.४० कोटीवर करोत्तर नफा गेला तर कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील ३८.४४ कोटींच्या तुलनेत घसरण होत या तिमाहीत कमाई ३१.३२ कोटींवर पोहोचली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी (Working Cap ital Requirements) सह, इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला २८.५१ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले असून त्यामध्ये ३०.३८ वेळा सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors),पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ( QIB) ५.०६ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ३५.३९ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले.